Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात काय चालले आहे आणि पुढे काय घडणार आहे याबाबत कोणीच सांगू सकत नाही. कारण नुकतीच शहरातील माळीवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली. मात्र कोतवाली पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील माळीवाडा वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रोडवर गोळीबाराची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीस लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने मोठी अनर्थ घटना टाळला आहे. अचानक गोळीबार झाल्याने या आवाजाने या भागात चंगळीच धावपळ उडाली होती.

बुधवारी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून, कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना या बाबत माहिती समजताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही क्षणात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना कशामुळे झाली यावर आता पोलीस तपास करत असून ही घटना घडल्यामुळे या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.कोतवाली पोलिस त्या व्यक्तीची अधिक चौकशी करत आहेत.