Ahmednagar News : माळीवाडा परिसरातील मार्केट यार्डजवळ एका दुकानात काल (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाला होता. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
सोशल मीडियावर याची माहिती प्रसारित होताच नागरिकांमध्येही गोंधळ उडाला होता. दरम्यान ही घटना एका प्रसिद्ध डॉक्टरने केली असे म्हटले जात होते. परंतु आता या घटनचे वेगळेच वास्तव समोर आले आहे.

हा गोळीबार डॉक्टर नव्हे तर सिराज खान याने केला होता.बंदूक ही डॉक्टरांच्या सहाय्यकाच्या हातात दिली होती. प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करुन पैसे उकळण्याच्या उद्देशाने हे कृत्य झाल्याचे आता समोर आलेय.
अधिक माहिती अशी : आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांवर डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या दावाखान्याबाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरुन गुन्हा दाखलहोत व तो डॉक्टरांमुळेच आपल्यावर दाखल झाल्याचे सांगत तो डॉक्टरांकडून पैसे उकळत होता.
पुन्हा डॉक्टरला भीती दाखवत डॉक्टरांकडून अधिक पैसे उकळण्यासाठी , मोठे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी त्याने आता मोठा प्लॅन आखला. सिराज याने कट करुन डॉक्टर तुपेरे आणि राजेंद्र बहुधने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अँड बर्ड हाऊस येथे आणले.
सिराजने यावेळी राजेंद्र बहुधने यास मारहाण केली. त्यानंतर त्याने राजेंद्र बहुधने यावर गोळी फायर करण्याचे नाटक केले व गोळी जमिनीवर फायर केली. त्यानंतर त्यानेच हुशारीने तीच बंदूक राजेंद्र बहुधने यांच्या हातात देऊन टाकली.
त्यानंतर त्याने डॉ. प्रदीप तुपेरे यांना दम दिला व सांगितलं की राजेंद्र बहुधने यानेच माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तुम्ही सांगायचे असे सांगितले. या सर्व प्रकारामुळे डॉक्टर घाबरतील व आपल्याला पैसे देतील असा त्याचा प्लॅनिंग होता.
डॉ. प्रदीप तुपेरे यांनी देखील घाबरून सिराजने जसे सांगितले तसे पोलिसांना सांगण्यास सुरवात केली. परंतु ते जबाब देत असताना अनेक वेळा अडखळल्याने पोलिसांना संशय आला.
त्यानंतर मग पोलिसांनी सर्व संशीयतांची वेगवेगळ्या खोलीत नेत विचारपूस करताच ही सगळी बनवाबनवी समोर आली व डॉ. तुपेरे आणि राजेंद्र बहुधने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.