Ahmednagar News : सध्या अकोले तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागात खरिपाच्या पेरण्यासह उगवण झालेल्या पिकांच्या मशागतीची कामे शेतकरी करत आहेत. मात्र ऐन पिकांच्या मशागत करून खते देण्याच्या वेळीच तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेत खते मिळत नाहीत, अनेक शेतकऱ्यांना अगोदर नको असलेली खते घेतल्याशिवाय हवे ते खत मिळत नाहीत. असे अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची एक गोणीसुद्धा मिळत नाही. अनेक शेतकरी खतांपासून वंचित राहिले आहेत.
अकोले तालुका हा तसा ग्रामीण अन दुर्गम तालुका आहे. येथील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती हाच आहे. मात्र ऐन पावसाळ्यात खरिप हंगामात तालुक्यात तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना खते उपलब्ध होत नाहीत. रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया खताची एक गोणीसुद्धा मिळत नाही. त्याचसोबत नामांकित कंपन्यांची खते मिळत नाहीत. काही दुकानदार नको असलेली खते घेतल्याशिवाय हवे ते खते देत नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतकऱ्यांना हि खते घावी लागत आहेत.
तालुका व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना ४ जुलै रोजी काही कृषी दुकानदार युरिया देत नाहीत, खतांचे लिंकिंग करीत असल्याबाबतचे पत्र ग्राहक पंचायतीने दिले, मात्र त्यावर चौकशी होण्याऐवजी कृषी दुकानदारांना आगाऊ माहिती देत सावध केले जाते.
यावर कारवाई केली जात नाही. यामुळे सर्वसामान्य शेतकरी तक्रार करण्यास धजावत नाहीत, अशी नाराजी अकोले ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून त्यांच्यासमोर व्यक्त करत जे शेतकरी खतांपासून वंचित राहिले त्यांना खते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली.