Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रात हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या खूपच अधिक आहे.
अनेकांचा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर गाढा विश्वास आहे. शेतकरी म्हणतात की एक वेळ हवामान खात्याचा अंदाज चुकेल मात्र पंजाबरावांचा अंदाज चुकत नाही.

पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने याचा त्यांना शेती कामांमध्ये मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान पंजाब रावांनी जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात नुकताच एक नवीन अंदाज व्यक्त केला आहे.
यात पंजाबरावांनी महाराष्ट्रात 26 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात जिथे पावसाला सुरुवात होईल तिथे पावसाचा दोन दिवसाचा मुक्काम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात म्हणजेच महाराष्ट्रात सर्वदूर या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळात पावसाची तीव्रता चांगली राहिल आणि यामुळे ओढे-नाले भरून वाहणार आहेत. काही भागांमधील छोटे-मोठे तळे देखील भरले जातील. तसेच मोठ्या धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक देखील वाढेल असा आशावाद पंजाबरावांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पंजाबराव म्हणतात की, दरवर्षी दहा ते पंधरा जुलै दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो. या काळात आषाढी वारी असते आणि या आषाढी वारीच्या कालावधीत दरवर्षी चांगला दमदार पाऊस पडत असतो.
यंदाही या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचा कुठेच खंड पडणार नाही. चार-पाच दिवस मराठवाडा विभागात तर चार-पाच दिवस विदर्भ विभागात अशा पद्धतीने पाऊस सुरूच राहणार आहे.
पंजाबरावांनी 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. मात्र 14 जुलै ते 20 जुलै या सात दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात व्यक्त केली आहे.