महिन्याला 6 हजारची एसआयपी किती वर्षात बनवेल तुम्हाला कोट्याधीश? 20 हजार रुपये पगार देखील तुम्हाला बनवू शकते करोडपती

Ahmednagarlive24 office
Published:
sip

Become Crorepati Tips:- तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला किती पैसा कमावत आहात याला जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व हे तुम्ही कमावत असलेल्या पैशांची बचत किती करत आहात व ती बचत कशा पद्धतीने आणि कोणत्या ठिकाणी गुंतवतात याला खूप महत्त्व आहे.

कारण तुमची चांगल्या पर्यायातील गुंतवणूक आणि त्यातील सातत्य तुम्हाला काही वर्षात लखपती ते करोडपती देखील करू शकते. फक्त तुम्हाला गुंतवणुकीचे एक योग्य नियोजन करणे गरजेचे असते व चांगला पर्याय गुंतवणुकीसाठी निवडणे फायद्याचे ठरते. या मार्गाने तुम्ही अगदी तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये पगार असेल तरी देखील तुम्ही काही वर्षांमध्ये करोडपती होऊ शकतात.

योग्य नियोजन महत्त्वाचे

तुम्हाला जर वीस ते पंचवीस हजार रुपयांचा पगार असेल तर तुम्ही करोडपती होऊ शकता व त्याकरिता योग्य आर्थिक नियोजन ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही जर एखाद्या चांगल्या ठिकाणी दीर्घकाळापर्यंत नियमित गुंतवणूक केली तर ही बाब सहज शक्य आहे. या पद्धतीने करोडपतीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक उत्तम पर्याय आहे.

या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला नियमितपणे काही ठराविक रक्कम गुंतवणूक गरजेचे असते व तुम्ही लहानातली लहान रक्कम जरी गुंतवली तर यावर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळून तुम्ही दीर्घ कालावधीत एक मोठी रक्कम जोडू शकतात.

महिन्याला 6000 ची एसआयपी केल्यानंतर किती वर्षात व्हाल तुम्ही कोट्याधीश?

समजा तुम्हाला 20 हजार रुपये महिन्याला पगार आहे व त्यातील वीस ते पंचवीस टक्के म्हणजे साधारणपणे चार ते पाच हजार रुपये गुंतवणुकीसाठी आरामात बाजूला काढू शकतात. यामध्ये तुम्ही जर छोट्या रकमेची गुंतवणूक कराल तर तुमचे करोडपतीचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल.

समजा तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये इक्विटी म्युच्युअल फंडात एसआयपी करत आहात व यावर तुम्हाला बारा टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळाला तर तुम्हाला एक कोटी रुपये जमा करण्याकरिता 26 वर्षांचा कालावधी लागेल.

परंतु तुम्हाला जर 24 वर्षात एक कोटी रुपये जोडायचे असतील तर तुम्हाला तुमच्या वीस हजार रुपये प्रति महिना पगाराचा 30 टक्के भाग म्हणजे 6000 रुपयांची एसआयपी करणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही जर सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर 24 वर्षात तुम्ही एक कोटी रुपये जमा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe