साजन पाचपुते यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले : निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईल !

Published on -

Ahmednagar News : माझ्यावर विश्वास ठेवा गुलाल आणून दाखवतो, आणि निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईल असा आत्मविश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी व्यक्त केले. चाळीस वर्षे आम्हीच या तालुक्याचे आमदार होतो पण आजही तालुक्यात रस्ते, वीज, पाणी प्रश्न जैसे थेच आहेत. त्यामुळे तालुक्यात फिरायची सुद्धा आता मला लाज वाटते एवढे वर्षे आमदार असून नेमक काय केल असा प्रश्न पडतोय. असे म्हणत त्यांनी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील काही दिवसापुर्वी श्रीगोंदा शहरात आठ दिवस विजपुरवठा खंडित होता. तेव्हा आमदार कुठे होते. मला आमदार करा,मी आमदार असतो तर या असल्या अधिकाऱ्यांना कपडे काढून उभा करत जाब विचारला असता.

काष्टी गावचा मी सरपंच आहे, पण स्वतःचा मुलगा पडला म्हणून मला निधी देत नाहीत गावाची अवस्था वाईट आहे असा आरोप त्यांनी आ. पाचपुते यांच्यावर करत महाविकास आघाडीकडून विधासभा उमेदवारीची मागणी केली. सध्या श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासनावर आमदारांचा वचक नाही त्यांना फक्त टक्केवारी घेण्यात रस आहे चाळीस वर्षे लोकांनी प्रेम केल तरी त्यांना टक्केवारीची अपेक्षा आहे. असा आरोप देखील पाचपुते यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले मुंबई कमजोर करण्याचा केंद्रीय मंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचा डाव असल्याचे सांगत मोदी हे खोटारडे पंतप्रधान असल्याची टीका केली .

तसेच साजन पाचपुते यांच्या उमेदवारीच्या मागणीला प्रतिसाद देत स्टेजवर बसलेले चार लोक आमदार होतील असे सांगतानाच तुम्हांला संपूर्ण तालुक्यात पोहोचाव लागेल असा सल्ला देखील त्यांनी साजन पाचपुते यांना दिला.

नगर जिल्ह्यात शिवसैनिकांना चांगले दिवस आले आहेत. खा निलेश लंके हे तुतारीच्या चिन्हावर खासदार झाले असले तरी ते मुळ शिवसैनिकच आहेत असे असल्याचे सांगत श्रीगोंद्यात आ. बबनराव पाचपुते एवढे वर्षे आमदार होते,मंत्री होते तरी कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाहीत विकासकामे झालेली नाहीत. बबनराव पाचपुते हे नकली पाचपुते असून त्यांना बाजूला करून आता खरे पाचपुते साजन यांना आमदार करा असे संजय राऊत म्हणाले.

साजन पाचपुते यांच्या श्रीगोंदा शहरातील बायपास रस्त्यावरील संपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी राणीताई लंके,वसंत मोरे,तालुकाप्रमुख विजय शेंडे, शहरप्रमुख संतोष खेतमाळीस,नगर काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे,उपप्रमुख संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसुंदर,संभाजी कदम,जि प सदस्य शरद झोडगे, शिवसेनेचे जेष्ठ नेते भाऊसाहेब गोरे,सरपंच ऋषिकेश शेलार,टिळक भोस उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe