Ahmednagar News : एकीकडे सरकारने ‘ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम’ हाती घेतली असताना दुसरीकडे किरणा दुकाने आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिक मिळत आहे. त्यामुळे शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
राज्यातील तरुणांचे प्रश्न सभागृहात कायम मांडणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यसरकारने ‘ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम’ हाती घेतली असताना किरणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिक हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. एनर्जी ड्रिंक्स केवळ हृदयासाठीच धोकादायक नसतात, तर त्यांचा मेंदूवरही परिणाम होतो. हे मद्यपान केल्याने तुम्हाला नैराश्य, चिंता आणि आत्महत्येचे विचार देखील येऊ शकतात. त्यामुळे असे एनर्जी ड्रिंक पिल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहासमोर आणले.
तसेच ५० रुपयांची गोळी मिळते ही गोळी विद्यार्थ्यांना दोन दोन दिवस नशा देत असते.त्यामुळे अशा पदार्थ आणि जाहिरातींवर बंदी घालावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली. त्याचसोबत राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असून त्यावर देखील कोणत्याही प्रकराची कारवाई केली जात नाही.
त्यावरुन आ. तांबे यांनी अन्न आणि औषध प्रशासनचे अधिकारी कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. या विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे म्हणत मागील एक वर्षात या विभागाने केवळ १६२ नमुने तपासले आणि त्यात फक्त १ नमुना दोषी निघाला असे कसे होऊ शकते असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले कि, कॅफिनचे अधिक प्रमाण असलेल्या एनर्जि ड्रिंक्सच्या शाळांच्या शाळांच्या ५०० मीटरच्या परिसरातील विक्रीला बंदी घालण्याचा आदेश लवकरच जारी केला जाईल.