वारकरी म्हणून आला, पाणी पिला अन्… महिलेसोबत केले ‘असे’ काही, अहमदनगरमधील धक्कादायक घटना

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका महिलेच्या घरी भिक्षूक वारकरी म्हणून पाणी प्यायला म्हणुन आला आणि काही क्षणात आजीबाईंच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी तिसगाव येथील मढी रोडवर घडली.

Published on -

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका महिलेच्या घरी भिक्षूक वारकरी म्हणून पाणी प्यायला म्हणुन आला आणि काही क्षणात आजीबाईंच्या गळ्यातील दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी तिसगाव येथील मढी रोडवर घडली.

याबाबतची माहिती अशी की, तिसगाव येथील द्वारकाबाई शेंदुरकर या वयोवृद्ध महिला घरासमोर बसलेल्या होत्या, त्यांच्या शेजारी त्यांच्या सुनबाईदेखील गप्पा मारत होत्या, काही वेळात त्या ठिकाणी मढीकडून तिसगावकडे जाणारा व स्वतःला भिक्षुक वारकरी असल्याचे म्हणत एक अज्ञात व्यक्ती शेंदूरकर यांच्या वस्तीवर आला,

त्या ठिकाणी या अज्ञात व्यक्तीने देवाधर्माच्या गप्पागोष्टीसुद्धा केल्या संबंधित व्यक्ती धार्मिक वृत्तीची असल्याचे जाणवल्याने शेंदुरकर आजी यांच्या सुनबाईंनी या भिक्षुकाला पिण्यासाठी पाणी दिले आणि त्यानंतर त्या काही वेळाने शेताकडे निघून गेल्या. घरी आता एकट्या शेंदुरकर आजीच असल्याचे या भामट्याच्या लक्षात आले,

थोड्यावेळ गप्पागोष्टी केल्यानंतर या आजी पण घरात निघून गेल्या आणि काही वेळातच हा भामटा भिक्षुक त्यांच्या पाठीमागेच घरात घुसला आणि त्यांच्या गळ्याला चाकू लावत या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील एक दीड तोळा सोने ओरबडून तेथून पसार झाला. आजीबाईंनी काही वेळाने आरडा ओरड केली सुनबाई घरी आर्त्या परंतु हा भामटा व्यक्ती सापडला नाही.

या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून वारकरी भिक्षुक म्हणून आलेल्या व्यक्तीचा पाहुणचार करावा की नाही, अशी चर्चा आता तिसगावमध्ये रंगली आहे. वास्तविक सर्वच भिक्षेकरी वारकरी भामटेगिरी करतात, असे नाही; परंतु असले प्रकार घडल्यानंतर चर्चा तर होणारच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe