रस्त्यावर गुडघाभर खड्डे, गाळ अन पाणीच पाणी; आक्रमक ग्रामस्थांनी केली रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात आंघोळ: अन दिला ‘हा’ इशारा

Published on -

Ahmednagar News : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याचे सर्वजण म्हणतात. मात्र या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी काय सुविधा लागतात याचा मात्र विसर पडतो. आज स्पर्धेच्या युगात अवघ्या एका क्लीकवर जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती एका क्षणात मिळते .

मात्र अजच्या या युगात देखील नागरिकांना साधे रस्ते देखील उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे रस्त्यासाठी पाठपुरावा करून थकलेल्या नागरिकांनी वैतागून रस्त्यासाठी चक्क रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला.हि घटना नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे.

याबाबत आधीक माहिती अशी, निंब्रळ ते निळवंडे रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने काल निंब्रळ व निळवंडे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले.

चक्क रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला. आता तरी अधिकारी दखल घेतील आणि रस्त्याची दुरुस्ती करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अकोले तालुक्यातील निंब्रळ ते निळवंडे रस्त्याची अतिशय भयाण दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांना रोज या रस्त्याने ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. साऱ्या रस्त्याने चिखलाचे साम्राज्य आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

त्यामध्ये पाणी साचलेले असून मोटारसायकल चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थ या रस्त्याने पाण्यातून पायी चालत जाणे पसंत करीत आहेत त्यामळे आज सर्व ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहाण्यास मिळाले. बाकीच्यांचा विकास आमच्या गावचे मरण ठरतंय, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

रस्त्यावर गुडघाभर खड्डे,रस्त्यावर गाळ व पाणीच पाणी, त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला आहे. तर ३१ जुलैपर्यंत रस्त्याचे काम सुरु झाले नाही, तर ३१ ३१ जुलै रोजी रस्ताच बंद करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.

या रस्त्यासाठी अनेक वेळा संज कागदोपत्री पाठपुरावा करुन शासन दुर्लक्ष का करतंय? असा सवाल सह केला आहे. जर ३१ जुलैपर्यंत या रस्त्याचे काम न झाल्यास रस्ताच बंद करण्यात येईल व गावात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही, असा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe