OnePlus 12 : वनप्लसच्या ‘या’ दमदार फोनवर मिळत आहे 7000 रुपयांची मोठी सूट, बघा कुठे सुरु आहे ऑफर!

Ahmednagarlive24 office
Published:
OnePlus 12

OnePlus 12 : जर तुम्ही OnePlus 12 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी चांगली आहे. सध्या Amazon वर या स्मार्टफोनवर भरघोस मिळत आहे. हा फोन OLED डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर यांसारख्या उच्च श्रेणीच्या वैशिष्ट्यांसह येतो.

Amazon वर या फ्लॅगशिप डिव्हाइसवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तथापि, ही ऑफर ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. OnePlus 12 चा 12GB 256GB व्हेरिएंट Amazon वर 64,999 रुपयांच्या मूळ किंमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. पण, या बँक ऑफरमुळे फोनची किंमत 57,999 रुपयांपर्यंत कमी होईल.

येथे ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना 61,749 रुपयांपर्यंत सूटही मिळू शकते. तथापि, एक्सचेंज ऑफरमध्ये जास्तीत जास्त सूट मिळविण्यासाठी, जुना फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. ग्राहकांना फोनवर नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही दिला जात आहे. ग्राहक हा फोन 16GB 512GB व्हेरिएंटमध्येही खरेदी करू शकतात.

OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा QHD 2K OLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, 50MP प्राथमिक कॅमेरा, 64MP टेलिफोटो कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5400mAh बॅटरी आणि 10WSUPEROC फास्ट चार्जिंगसह येतो .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe