RRC CR Apprentice Bharti : मध्य रेल्वे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता तपासावी.
वरील भरती अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण २४२४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
10th पास आणि ITI in Related Trade
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 15 – 24 वर्ष इतकी आहे.
अर्ज शुल्क
येथे अर्ज शुल्क १००/- रुपये इतके आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
-ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-अर्ज हा पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.