राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी सांगितले, की दि. १२ जून रोजी राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत प्रवीण भोसले याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धर्मराज पाटील व पोलीस पथक गेल्या महिन्याभरापासून आरोपीचा व पीडित मुलीचा शोध घेत होते.
दरम्यान आरोपीचा सुगावा लागताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय, पोलीस नाईक देवीदास कोकाटे, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ चेमटे या पोलिस पथकाने आरोपी प्रशांत प्रवीण भोसले यास नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले.
पथकाने आरोपीच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका करून तीला तीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करीत आहेत.