प्रस्थापित कारखानदारांना निवडणुका आल्यावरच जनतेची आठवण येते – किसन चव्हाण

Ahmednagarlive24 office
Published:
kisan chavhan

शेवगाव – पाथर्डी तालुक्यात किमान १५० घोंगडी बैठका झाल्या, या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोठी जनशक्ती वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झाली आहे. बहुतेक शेतकरी, गोरगरीब कुटुंबांना, घरकुल, डोल, कुपन, शिवरस्ते, पाणंद रस्ते, वीजपुरवठ्यासंदर्भात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने घरात बसलेले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले मतदारसंघातील कारखानदार घराबाहेर पडले आहेत. निवडणुका आल्यावरच या प्रस्थापित कारखानदारांना जनतेची आठवण येते, या कारखादारांना या निवडणुकीत जनतेने जागा दाखवण्याचे ठरवले असल्याचे प्रतिपादन वंचीत बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसनराव चव्हाण यांनी केले.

सोमवारी मोहोज देवढे येथे वंचित बहुजन आघाडी शाखा उद्घाटन व किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक मारुती मंदिराच्या सभामंडपात उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी विद्यमान सरपंच रावसाहेब देवढे, विष्णू खंडागळे, शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई, लक्ष्मण मोरे, संजय सिरसाठ, सिध्दु गर्जे, अरविंद साळवे, तुकाराम काटे, पंढरीनाथ सोनवणे, बंडा देवढे, केजी उबाळे, विजू दादा खंडागळे, आनंद उबाळे, देवीदास भारस्कर, बाळू उबाळे, विकास उबाळे,

रणजित थोरात, संतोष सिरसाठ, पाथर्डी शहराध्यक्ष राजुशेठ पठाण, राजू पवार, संजय पगारे, आजिनाथ देवढे, शिवाजी शिरसाठ, राजु सिरसाठ, शंकर सिरसाठ, रामा सोनवणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते गोरक्ष देवढे यांनी केले, तर शंकर शिरसाठ यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe