Gold Rate: एका वर्षात सोन्याचे दर जाऊ शकतात ८८ हजार प्रति तोळ्याच्या पुढे! म्हणून गोल्ड ईटीएफमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा बरेच फायदे

Ajay Patil
Published:
gold etf

Gold Rate:- गुंतवणुकीच्या दृष्टीने सध्या अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व गुंतवणूक करताना जोखीम तसेच गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांची निवड केली जाते. यामध्ये बँक आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना जास्त करून प्राधान्य दिले जाते.

परंतु यामध्ये जर आपण सोन्याची खरेदी किंवा सोन्यातील केलेली गुंतवणूक पाहिली तर ती कित्येक वर्षापासून भारतात चालत आलेली आहे व सोन्यातील गुंतवणुकीला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील समजले जाते. सोन्याची गुंतवणूक ही दागिने म्हणून सोन्याची खरेदी किंवा गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी या दृष्टिकोनातून केली जाते.

सध्या जर आपण सोन्याच्या किमती पाहिल्या तर त्या सातत्याने वाढताना आपल्याला या एका वर्षामध्ये दिसून येत आहेत आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीत आणखीन वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये जर आपण अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी सिटीबँकचा अहवाल पाहिला तर त्यानुसार 2025 च्या मध्यापर्यंत सोन्याच्या किमतीमध्ये 2.5 लाख रुपये प्रति औंस म्हणजेच भारतीय रुपयात 88,450 रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत पोहोचू शकतात.

या पार्श्वभूमीवर तुम्हाला देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची प्लॅनिंग असेल तर तुम्ही ती करू शकतात. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही भौतिक सोने खरेदी करण्यापेक्षा ते गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करून एक फायद्याचे ठरू शकते.

जर आपण गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाचा परतावाचा विचार केला तर यामध्ये दिसून येते की एका वर्षामध्ये गुंतवणुकीवर 24% पर्यंत परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.

 कसे आहे गोल्ड ईटीएफचे स्वरूप?

गोल्ड ईटीएफ हा सोन्याच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींवर प्रामुख्याने आधारित असतो. यामध्ये एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजेच एक ग्राम सोने असं त्याचा अर्थ होतो व ते सोने पूर्णपणे शुद्ध मानले जाते. ज्याप्रमाणे शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स बीएससी आणि एनएसई वर खरेदी आणि विक्री केले जातात. त्याप्रमाणे गोल्ड ईटीएफची खरेदी किंवा विक्री केली जाते.

फक्त यामध्ये तुम्हाला खरेदी करताना सोने मिळत नाहीत. तुम्हाला या व्यवहारातून जेव्हा बाहेर पडायचे असते तेव्हा तुम्हाला मात्र सोन्याच्या किमती एवढे पैसे परत मिळतात.

 गोल्ड ईटीएफमध्ये कराल गुंतवणूक तर मिळतील हे फायदे

1- कमी प्रमाणात सोन्याची खरेदी शक्य आपण जसे पाहिले की गोल्ड ईटीएफमध्ये सोन्याची युनिटमध्ये खरेदी केली जाते व एक युनिट म्हणजे एक ग्रॅम असते. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात किंवा एसआयपीच्या माध्यमातून देखील सोन्याची खरेदी करू शकतात.जर भौतिक पद्धतीने सोने खरेदी केले तर ते दहा ग्रॅम म्हणजेच तोळा या किमतीमध्ये विकले जाते.

बऱ्याचदा आपल्याला ज्वेलर्स कडून सोने खरेदी करताना ते कमी प्रमाणात खरेदी करणे शक्य होत नाही. परंतु तुम्ही ईटीएफ मध्ये तुमच्या पद्धतीनुसार कितीही कमी प्रमाणात सोन्याची खरेदी करू शकता.

2- शुद्ध सोने मिळते सोन्याच्या एटीएफ ची किंमत पाहिली तर ती एक समान आणि पारदर्शक असते व ती लंडन बुलियन मार्केट असोसिएशनच्या माध्यमातून ठरते.

गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून तुम्ही सोने खरेदी केले तर ते सोने 99.5% शुद्धतेची हमी देते व ही शुद्धतेची उच्च पातळी आहे. तुम्ही जे काही सोने खरेदी करतात त्यामध्ये त्या सोन्याची किंमत ते किती शुद्ध आहे त्यावर आधारित असते.

3- सोने बनवण्याचा म्हणजेच मेकिंग चार्ज लागत नाही यामध्ये तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी एक टक्के वार्षिक शुल्कासह गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी एक टक्के किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते. परंतु तुम्ही जर सोनाराकडून नाणी किंवा बार खरेदी केले तर ज्वेलर्स आणि बँकांना तुम्हाला आठ ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्जेस द्यावा लागतो. त्या तुलनेमध्ये गोल्ड ईटीएफ साठी द्यावा लागणारा वार्षिक एक टक्के शुल्क हा चार्जेस काहीही नाही.

4- तुम्ही खरेदी केलेले सोने सुरक्षित राहते हे एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे सोने असते व ते तुमच्या डिमॅट खात्यामध्ये ठेवलेले असते.त्याकरिता तुम्हाला फक्त वर्षाला डिमॅट शुल्क देणे गरजेचे असते. यामध्ये तुम्हाला चोरीची भीती राहत नाही. या तुलनेत मात्र तुम्ही भौतिक सोने घेतले तर तुम्हाला चोरीचा धोका असतो आणि त्याच्या सुरक्षिततेवर खर्च देखील करावा लागतो.

5- गोल्ड ईटीएफची पटकन खरेदी विक्री करता येणे शक्य गोल्ड ईटीएफ तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय पटकन खरेदी करता येतो आणि पटकन विकता देखील येतो. महत्वाचे म्हणजे तुम्हाला जर कर्ज हवे असेल तर सुरक्षा म्हणून तुम्ही ईटीएफचा वापर करून कर्ज देखील घेऊ शकतात.

 गोल्ड ईटीएफमध्ये कशी कराल गुंतवणूक?

याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा जो काही ब्रोकर असेल त्याच्याकडून डिमॅट खाते उघडणे गरजेचे आहे. डिमॅट खाते उघडल्यानंतर तुम्ही NSE वर उपलब्ध गोल्ड ईटीएफचे युनिट खरेदी करू शकतात आणि तुमच्या डिमॅट खात्याशी जे काही बँक अकाउंट तुमचे जोडलेले असते त्यातून तेवढी रक्कम कापली जाते. तुमच्या डिमॅट खात्यातून ऑर्डर दिल्यानंतर दोन दिवसांनी गोल्ड ईटीएफ तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच त्यांची विक्री केवळ ट्रेडिंग खात्याच्या माध्यमातून केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe