Tata कंपनी सप्टेंबरमध्ये करणार मोठा धमाका ! लाँच होणार ‘ही’ CNG कार

Published on -

Tata Motors : तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? हो ना, मग तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कार बाजारात लवकरच एक नवीन CNG कार लॉन्च होणार आहे. टाटा मोटर्स सप्टेंबर महिन्यात आपल्या एका लोकप्रिय मॉडेलचे सीएनजी वेरियंट बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनी आपल्या एका लोकप्रिय एसयूव्ही Tata Nexon चे सीएनजी मॉडेल सप्टेंबर महिन्यात लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

अर्थातच सीएनजी एसयूव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बाजारात एसयूव्ही कारला अधिक मागणी आली आहे. सेडान ऐवजी SUV ची ग्राहकांमध्ये अधिक क्रेज पाहायला मिळत आहे.

यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आता SUV च्या प्रोडक्शन कडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. टाटा कंपनीने देखील आत्तापर्यंत अनेक SUV कार लॉन्च केल्या आहेत. Nexon ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय कार आहे.

कंपनीची ही एक हॉट सेलिंग कार आहे. दरम्यान, आता याच लोकप्रिय कारचे CNG मॉडेलचे दिवाळी आधी लॉन्चिंग होणार असे बोलले जात आहे. खरंतर कंपनीकडून या मॉडेलचे गेल्या अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरू आहे.

अजून या गाडीचे टेस्टिंग पूर्ण झालेले नाही मात्र सप्टेंबर पर्यंत या गाडीचे टेस्टिंग पूर्ण होईल अशी आशा आहे आणि यानंतर ही गाडी अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या गाडीचे डिझाईन आणि या गाडीचे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार डिजाईन

आगामी Nexon CNG चे डिजाईन सध्याच्या ICE मॉडेल प्रमाणेचं राहील असे वाटते. या गाडीच्या फ्रंटला LED टर्न इंडिकेटर मिळणार आहे. यात स्प्लिट एलईडी हेडलॅम्प देखील राहणार आहेत. कारला नवीन बंपर, नवीन अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस Y-पॅटर्न एलईडी टेल लॅम्प्स दिले जातील अशी शक्यता आहे. यामध्ये कंपनीचे ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान दिले जाणार आहे. या गाडीला मोठी बूट स्पेस राहणार आहे.

कसे असतील फिचर्स

येत्या काही महिन्यांनी भारतीय कार बाजारात लॉन्च होणाऱ्या Nexon CNG च्या केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड, नवीन 2-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 10.25-इंच डिजिटल कन्सोल आणि सनरूफ यांसारखें अत्याधुनिक फीचर्स राहणार आहेत.

यातील बहुतांशी फिचर्स हे सध्याच्या मॉडेल सारखेच राहणार आहेत. फक्त सध्याच्या मॉडेलच्या आणि नव्याने लॉन्च होणाऱ्या सीएनजी मॉडेलच्या इंजिन मध्ये फरक राहणार आहे. फक्त CNG इंजिनद्वारे प्रदान केलेल्या पॉवर आणि टॉर्कमध्ये फरक पाहायला मिळणार आहे.

या CNG SUV मध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे की पेट्रोल मोडमध्ये 118bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क निर्माण करणार आहे. तसेच, CNG मोडमध्ये असताना आउटपुट 100bhp पॉवर आणि 150Nm टॉर्क प्रोड्युस करणार आहे.

हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलेले राहणार आहे. या आगामी CNG Nexon ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.15 लाख रुपये असू शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe