अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीमध्ये विकास व्हावा तसेच साईभक्तांच्या सोयीसाठी जे विमानतळ झाले त्यासाठी काकडी येथील शेतकर्यांनी जमिनी दिल्या होत्या. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना नोकर्या व इतर आश्वासने दिली होती.
त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना नोकर्याही दिल्या पण त्या कंत्राटी स्वरूपाच्या. आणि आता या कमावरूनही 21 कर्मचार्यांना अचानक कमी करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेक दिवसांपासून हे कामगार याठिकाणी काम करत आहेत. जमीनही गेली नोकरीही गेली. आता काय करायचे असा प्रश्न या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांपुढे उभा राहिला आहे.
दिलेले आश्वासन पूर्ण करणे तर दुरच मात्र कंत्राटी नोकरी गमावण्याची वेळ या शेतकरी पुत्रांवर आली आहे. परिसराचा विकास करू,अशा आश्वासनावर जमिनी घेतल्या आतातर नोकरीवरून काढून टाकले जात आहे.
आम्हाला पुन्हा कामावर सामावून घ्या, अशा मागणीचे निवेदन शेतकर्यांच्यावतीने प्रकल्पग्रस्त प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेचे संस्थापक कानिफनाथ गुंजाळ यांनी काकडी विमानतळ व्यवस्थापकीय संचालक दीपक शास्त्री यांना दिले आहे.
नोकरीवर नाही घेतलं तर लवकरच विमानतळाच्या गेटवर आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही या कामगारांनी यावेळी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved