सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी पोलीस अधिकारी म्हणून सदैव तत्पर राहणार…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नांदेड येथून अहमदनगरला बदलून आलेले अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी श्री. राठोड म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा आणि राजकीय दृष्टीने संवेदनाशील जिल्हा आहे.

स्नेहबंध फौंडेशन तर्फे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी नूतन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांचा सत्कार केला. त्यावेळी बोलत होते.

राठोड म्हणाले, प्रामुख्याने प्रलंबित गुन्ह्याचा तपास लावणे. कायदा सुव्यवस्था जिल्ह्यात आबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मी काम करणार आहे.

यात सर्वसामान्यावर अन्याय होणार नाही, यासाठी पोलिस अधिकारी म्हणून सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उद्धव शिंदे यांनी राठोड यांना शुभेच्छा दिल्या

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved