मुलीचा परकरच्या नाड्याने गळा आवळून खून गेला.. साईसंस्थान रुग्णालयातील कचराकुंडीत मृतदेहाचा उलगडा..

काल बुधवारी शिर्डीतील साईसंस्थानच्या रुग्णालयात कचराकुंडीत मुलीचा मृतदेह आढळला होता. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाचा हा मृतदेह होता. आता हा मृतदेह तेथे कसा आला व या मुलीचा खून कसा झाला याचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

Published on -

Ahmednagar News : काल बुधवारी शिर्डीतील साईसंस्थानच्या रुग्णालयात कचराकुंडीत मुलीचा मृतदेह आढळला होता. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाचा हा मृतदेह होता. आता हा मृतदेह तेथे कसा आला व या मुलीचा खून कसा झाला याचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

या मुलीचा परकरच्या नाड्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ही हत्या अनैतिक संबंध किंवा मुलगी नकोशी असल्याने झाल्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास एक महिला स्वच्छता कर्मचारी डिलेव्हरी वार्डबाहेरील कचराकुंडी साफ करत असताना तिला एका गुलाबी पिशवीत काहीतरी जड आढळले. तिने पिशवी उघडली असता आत संगमनेर येथील एका दुकानाच्या नावाची पिशवी होती.

त्यात काळ्या परकरमध्ये गुंढाळलेले व काही तासांपूर्वीच जन्मलेले स्त्री जातीचे बाळ होते. या बाळाच्या गळ्याला नाड्याने आवळलेले दिसत होते. तसेच तिची नाळ सुद्धा क्रूरतेने तोडल्याचे वाटत होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

डॉक्टरांनी तपासणी केली असता ते मृत झालेले होते. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तत्काळ रुग्णालय अधीक्षक मैथिली पितांबरे यांना कळवले. त्या तातडीने रुग्णालयात दाखल झाल्या. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.

पहाटेपर्यंत पोलिस व डॉ. पितांबरे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. मात्र त्यात काही आढळून आले नाही.

त्या दिवसभरात साईनाथ रुग्णालयातही प्रसूती झालेली दिसत नाही. आम्ही अधिक तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe