महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपची घमेंड जिरवली : बाळासाहेब थोरात !

Ahmednagarlive24 office
Published:
thorat

लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. ही कमाल फक्त जनताच करुन दाखवू शकते. भाजपचा अहकांर, घमेंड सगळा मतदारानी जिरवला.

देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड अहंकार जनतेने जिरवून दाखवला. भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे, असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अहमदनगर येथे मार्केट यार्ड परिसरात घनश्याम शेलार यांच्या कार्यालयाच्या शुंभारभप्रसगी ते बोलत होते.

श्री. शेलार म्हणाले, श्रीगोंदा व नगर तालुक्यात साडेचार वर्षात जनसंर्पकांच्या माध्यमातून चांगली कामे केली. मागील निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यात मागे राहिलो. मात्र नगर तालुक्यातील ४५ गावानी चांगले लिड दिले. मतदारसंघात मी नेत्यामुळे पराभूत झालो, मतदारामुळे नाही, असे त्यांनी नमुद केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, कॉग्रेस माजी तालुकाध्यक्ष, सपंत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, शरद पवार, बाबा सय्यद पापा पटेल, रमेश ठोबरे, विक्रम कासार, भगवान बोठे, इंद्रजीत बोठे, तात्या बेरड, मारूती लांडगे, स्मितल वाबळे मनोहर पोटे, संजय आनंदकर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe