Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा व या जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिलेले. या जिल्ह्यावर पवार घराण्याचे विशेष लक्ष. सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्हीही जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान आता आगामी विधानसभेच्या अनुशंघाने सध्या विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील दिग्गज राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे माजी आ. भानुदास मुरकुटे. नुकतेच अशोक सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटीचे थकहमी मंजूर केली आहे.
राज्यातील ५ कारखान्यांना नव्याने ही थकहमी मंजूर झाली आहे. त्यात माजी आ. भानुदास मुरकुटे मुख्य असणाऱ्या अशोक कारखान्याचा समावेश आहे.
रिटर्नगिफ्ट ?
लोकसभा निवडणुकीत मुरकुटेंनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मदत केल्यानेच हे रिटर्नगिफ्ट दिल्याचे सध्या नागरिक बोलत आहेत. मुरकुटे हे सध्या कोणत्याच पक्षात नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोनदा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत नंतर मेळावे घेऊन महायुतीला पाठिंबा जाहिर केला होता.
मुरकुटे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार लोखंडे यांना मदत केल्याने त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अशोक कारखान्याला ही थकहमी मंजूर केली असल्याचे मानले जाते.
कारण कोपरगावच्या विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदार संघात पक्षा विरोधात निवडणूक लढविल्याने त्यांच्या साखर कारखान्याची थकहमी मात्र नामांजूर करण्यात आली आहे.
विधानसभेची तयारी?
मुरकुटे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी कोपरगावचे अशुतोष काळे, अशोकचे डायरेक्टर ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. मुरकुटे यांची महायुतीच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक
आणि उठबस पहाता आगामी विधानसभा निवडणुकीत मुरकुटे यांचा कल महायुतीच्या दिशेनेअसल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलतील का हे देखील पाहावे लागणार आहे.