Tata Motors Upcoming CNG Car : अलीकडे भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आली आहे. दरम्यान, जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात नवीन सीएनजी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे टाटा कंपनी लवकरच आपल्या एका लोकप्रिय कारचे सीएनजी व्हेरियंट भारतीय कार मार्केटमध्ये सादर करणार आहे.
Tata ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Nexon अशीच एक लोकप्रिय SUV आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स याच Nexon चे CNG व्हेरियंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
कंपनी आगामी टाटा नेक्सॉन सीएनजी सप्टेंबर 2024 च्या आसपास लॉन्च करणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. Tata Nexon च्या CNG प्रकारात 230 लीटरची बूट स्पेस दिली जाणार आहे. अलीकडच्या काळात टाटा नेक्सॉनच्या विक्रीवर थोडा परिणाम झाला आहे.
या कारच्या विक्रीत या चालू वर्षात अर्थातच 2024 मध्ये थोडीशी घट आली आहे. पण गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये टाटा नेक्सॉन ही कंपनीची बेस्ट सेलर कार ठरली होती. काही महिने ही गाडी सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही म्हणून टॉपवर राहिली होती.
दरम्यान आता कंपनी या गाडीचे सीएनजी व्हेरियंट भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च करणार असल्याने या गाडीच्या विक्रीमध्ये आणखी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या आगामी सीएनजी कारचे पावरट्रेन, फीचर्स आणि किंमत यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कशी राहणार Tata Nexon CNG
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या काही महिन्यांनी भारतीय कार मार्केटमध्ये दाखल होणाऱ्या या सीएनजी कार मध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे की 120bhp पॉवर आणि 170Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम राहणार आहे.
हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले राहील. ही गाडी सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे. यामुळे या गाडीची किंमत कशी राहणार आणि यामध्ये कोण कोणते नवीन फीचर्स अपलोडेड राहणार या संदर्भात अजून खात्रीलायक बातमी समोर आलेली नाही.
पण काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये याच्या किमती बाबत खुलासा करण्यात आला आहे. याच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर अपकमिंग Tata Nexon CNG प्रकार सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत 70,000 ते 80,000 रुपयांनी महाग राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.