बिबट्याने आजीला उचलले, ओढत शेतात नेले.. नातवाने पाहिले अन बिबट्याला पिटाळून लावले.. अहमदनगरमधील थरार

वयोवृद्ध महिला शेतात गवत कापत होती.. गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झेप घेतली.. तिला शेतात ओढत नेले.. हा प्रकार आजीच्या नातवाच्या लक्षात आला..त्यानंतर नातवाने जिवाच्या आकांताने प्रयत्न केले..अन बिबट्याला पिटाळून लावले..

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

Ahmednagar News : वयोवृद्ध महिला शेतात गवत कापत होती.. गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झेप घेतली.. तिला शेतात ओढत नेले.. हा प्रकार आजीच्या नातवाच्या लक्षात आला..त्यानंतर नातवाने जिवाच्या आकांताने प्रयत्न केले..अन बिबट्याला पिटाळून लावले..

हा थरार घडलाय संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे. बिबट्याने रविवारी (दि. २८) सकाळी भीमबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५) यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना उचलून नेऊ लागला.

मात्र भीमबाईंचा नातू प्रसाद याने तातडीने धाव घेत बिबट्याच्या तावडीतून आजीला वाचवले. दरम्यान, भीमबाई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन लोंढे यांनी दिली.

घराशेजारील शेतात भीमाबाई लामखडे गवत कापत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ओढून नेले. भीमाबाई यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचा नातू प्रसाद माधव लामखडे यांनी आजीच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली.

बिबट्या आजीला ओढून घेऊन जात असल्याचे पाहिल्यानंतर त्यानेही आरडाओरड केली. दरम्यान, लामखडे कुटुंबातील काही लोक ओरडण्याच्या आवाजाच्या दिशेने पळाले. याचवेळी बिबट्याने आजीला सोडून धूम ठोकली.

आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी नातवाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. भीमाबाई गंभीर जखमी झाल्या असून त्यांचा गळा, नाक, तोंड, कान, डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दरम्यान, वन विभागाचे राकेश कोळी, ओंकार गोर्डे, अरुण यादव, अण्णा हजारे, रवी पटोडे, अर्चना गुंडार, पठाण आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देवगाव येथे पिंजरा लावण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe