खाण्याचे पान अर्थात नागवेलीची पाने हे कुणाला माहिती नाही असे शोधून सापडणार नाही. अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. आपली जुनी माणसे अर्थात आजी आजोबा जर पाहिले तर त्यांच्याकडे पानाचा डब्बा असायचा.
जेवण झाल्यानंतर पानाचा विडा खाल्ला जायचा. परंतु तुम्हाला ऐकून धक्का बसेल की ही पान अनेक आजारांना आपल्यापसून दूर ठेवते. म्हणजे आजोबांचा पानाचा विडा हा किती आरोग्यदायी हे आपल्या लक्षात आलेच असेल.

पान खाण्याने तोंडाची चव तर वाढतेच पण तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना ही पान करते. त्यामुळे दात किडणे, तोंडाला दुर्गंध असले प्रकार होत नाहीत. शिवाय उत्तम बलवर्धक असलेली ही वनस्पती सर्दी, खोकला अशा आजारांवर गुणकारी असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती म्हणूनच या नागवेलीची ओळख आहे. नागवेली ही सदाहरित व बहुवर्षायू वेल आहे. नागवेली ही वनस्पती पायपरेसी कुलातील असून, तिचे शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे.
तिला पानवेल, विड्याची पाने किंवा खाऊची पाने असेही म्हणतात. उष्ण व ओलसर हवामानात ही वेल चांगली फोफावते. पानातील तेल जंतुनाशक पानांतील बाष्पनशील तेल जंतूनाशक असते. त्यामुळे जंतुसंसर्ग कमी करण्यासही मदत होते.
तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यासाठी पानांचा रस उपयोगी येतो. डोके दुखत असल्यास पानांचा रस वापरतात. पाने फुप्फुसाच्या विकारांत गुणकारी असून, गळू व सूज यावर त्यांचे पोटीस बांधतात.
पान सुगंधी, तिखट, तुरट व उत्तेजक असून, ते वात, कफशामक आहे. त्यामुळेच श्वसनसंस्थेवरती काम करणारे असे आहे. याच्या सेवनामुळे कफदृष्टीमुळे होणारे विकार सर्दी, खोकला दूर करण्यात मदत होते.
पाने सुगंधी, पाचक, उत्तेजक असून योग्य पदार्थ घालून केलेला विडा, दोन्ही जेवणानंतर खाल्ल्यास नक्कीच आरोग्यास फायदा होतो असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.