श्रीगोंद्यात पोलिसांच्या वेशातील भामट्याने लुटले १५ लाख, तो भामटा कोण याचा तपास सुरु !

Ahmednagarlive24 office
Published:
fraud

श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या नगर-दौड महामार्गावरील टोलनाक्या जवळ एका चारचाकी गाडीमध्ये १५ लाख रुपयाची कॅश घेऊन ती बदलण्यासाठी जात असताना अचानक खाकी वर्दीतील काही इसमांनी गाडी अडवून त्यातील १५ लाख रुपये आणि एक व्यक्ती घेऊन पोलीस स्टेशनला जातो, असे सांगून गेले. मात्र त्यांचा अद्यापही तपास लागत नसल्याने संबंधितांची फसवणूक झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.

सोलापूर जिल्ह्यातून नगरच्या दिशेने दौंड वरून नगर कडे जाणाऱ्या एका चार चाकी गाडीमध्ये १५ लाख रुपयांची रोकड घेऊन तिचे ५५ लाख रुपयाचे नकली नोटा घेण्यासाठी चाललेल्या लोकांना श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवरील महामार्गावर काष्टी सांगवी फाटा जवळ टोलनाक्या नजीक चारचाकी गाडीमध्ये आलेल्या वर्दी मधील दोन पोलिसांनी अडवले.

त्यांना दमदाटी करत त्यांच्याकडील रोख पंधरा लाख रुपयाची रक्कम व त्यांचा एक व्यक्ती घेऊन पोलीस स्टेशनला या असे सांगितले. १५ लाख रुपये घेऊन त्यांचा एक व्यक्ती पोलिस सोबत घेऊन गेले मात्र या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी त्यांच्या संबधित इसमाचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ते कुठेही मिळून आले नाहीत. त्यामुळे संबंधित ठिकाणी अडवून अशा प्रकारचे काही स्कॅम झालेत का? याबाबत नातेवाईकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.

आलेल्या पोलिसांमध्ये सावंत नावाचा एक पोलीस असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र याबाबत सखोल चौकशी केली असता सावंत नावाचा कोणताही पोलीस श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नाही.

त्यामुळे ही घटना होती की फसवणुकीचा प्रकार होता हे मात्र समजू शकले नाही तर त्यातील एकाने आमच्यावर हा प्रकार घडून आणल्याचे सांगितले मात्र याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe