गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी निधीची मागणी, महसूलमंत्री विखेंनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे

Published on -

Ahmednagar News : गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून याबाबत लवकरच निर्णय करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ब्रिटीश कालवे म्हणून गोदावरी कलव्याची ओळख वर्षानूवर्ष जुन्या झालेल्या या कालव्यांना एकदाच नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्धता करून देण्यात आली होती. त्यानंतरही दुर्लक्षित झालेल्या गोदावरी कालव्यांची दुरूस्ती होत नसल्याने गोदावरी धरण समूहातून सोडण्यात येणारे आवर्तन लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहचण्यास मोठा कालावधी लागतो.

यावरून पाण्याचे संघर्षही निर्माण शेतकऱ्यांचा संपूर्ण रोष विभागावर आणि सरकारवर येतो ही वास्तविकता महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. कालव्याच्या दुरूस्तीकरिता निधी उपलब्ध झाल्यास कालव्याची काम वेगाने पूर्ण होतील आणि पाण्याच्या आवर्तनातील सर्व अडथळे दूर झाल्यास शेवटच्या गावापर्यत पाणी विनाविलंब पोहण्यास मोठी मदत होईल याकडे उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यात आले.

गोदावरी कालव्यांचे क्षेत्र खूप मोठे असून नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याची सिंचन व्यवस्था या कालव्यांवर अवलंबून आहे. त्यामुळेच कालव्याची झालेली जीर्ण आवस्था आणि कालव्या मध्ये असलेले अडथळे तातडीने काढून टाकणे गरजेचे आहे.

यासाठीच निधी उपलब्ध करून द्यावा या महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली असल्याचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe