अजितदादांचा सिक्सर ! विखे, शिंदेंच्या घोषणा बाजूलाच, आता आपल्या खास माणसाच्या मतदारसंघात उभारणार एमआयडीसी

राजकारणात आश्वासन,घोषणा या गोष्टी सुरु असतातच. बऱ्याचदा या घोषणा, ही आश्वासने पूर्ण होतातच असे नाही. दरम्यान अहमदनगरच्या जनतेने मागील काही दिवसांत मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात अशा घोषणा ऐकल्या.

Ahmednagarlive24 office
Published:
ajit dada

Ahmednagar Politics : राजकारणात आश्वासन,घोषणा या गोष्टी सुरु असतातच. बऱ्याचदा या घोषणा, ही आश्वासने पूर्ण होतातच असे नाही. दरम्यान अहमदनगरच्या जनतेने मागील काही दिवसांत मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात अशा घोषणा ऐकल्या.

त्या घोषणा म्हणजे एमआयडीसीच्या उभारणीच्या. विखेपाटील असोत किंवा रोहित पवार यांनी एमआयडीसीच्या घोषणा केल्या. त्यात शिर्डी, श्रीगोंदे, कर्जत जामखेड आदी ठिकाणी एमआयडीसी उभ्या करण्याच्या घोषणा होत्या.

आता या कधी उभ्या राहतील याकडे अनेकांचे लक्ष असताना आणखी एका एमआयडीसीची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत निर्देश दिलेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील लिंगदेव, अकोले याठिकाणी ‘एमआयडीसी’ उभी करण्यात येणार असून याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. इतकेच नव्हे तर नवीन एमआयडीसीसाठी यापुढे किमान शंभर एकर जमीन उपलब्ध करण्याच्या सूचना देखील त्यांनी देऊन टाकल्यात.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्याच्या विकासात उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राज्याच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याची सरकारची भूमिका आहे. राज्यातील प्रत्येक विभागांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

उंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांसोबत जागेची पाहणी करावी. त्याचबरोबर बारामती एमआयडीसीमधील प्रलंबित कामे, चाकण एमआयडीसीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

विखे, शिंदेंच्या घोषणा बाजूलाच…
मंत्री विखे पाटील यांनी श्रीगोंदे, शिर्डी येथे एमआयडीसी उभ्या करण्याच्या घोषणा केल्या. आ. राम शिंदे यांनी देखील कर्जत जामखेड येथे एमआयडीसी उभी करण्याच्या घोषणा केल्या. परंतु आता या घोषणा बाजूलाच राहिल्या आहेत.

त्याआधीच आता अकोलेत म्हणजे अजितदादा यांच्या खास असणाऱ्या आ. किरण लहामटे यांच्या मतदारसंघात एमआयडीसी उभी करण्याची घोषणाच त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe