सर्व्हर डाऊन ! रेशनधारक दुकानात हेलपाटे मारून बेजार, ऑगस्टसोबतच जुलै महिन्याचेही रेशन मिळणार? पहा..

सर्व्हर डाऊनच्या फटक्याने जुलै महिन्याचे रेशन अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. रेशन बुडू नये म्हणून नागरीक रोज रेशन दुकानावर हेलपाटे मारत होते; परंतु सर्व्हर चालू न झाल्याने अनेकांना रेशनपासून या महिन्यात वंचित राहावे लागले.

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : सर्व्हर डाऊनच्या फटक्याने जुलै महिन्याचे रेशन अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. रेशन बुडू नये म्हणून नागरीक रोज रेशन दुकानावर हेलपाटे मारत होते; परंतु सर्व्हर चालू न झाल्याने अनेकांना रेशनपासून या महिन्यात वंचित राहावे लागले.

जुलै महिन्याचे रेशन बुडते की काय, अशी धास्ती अनेकांच्या मनात आहे. ऑगस्ट महिन्यात दिल्या जाणाऱ्या रेशनबरोबरच जुलै महिन्याचे राहिलेले रेशन द्यावे, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे. सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक कारणामुळे लाभार्थ्यांना शिधा अर्थात रेशन मिळणे कठीण झाले आहे.

रेशन दुकानावरील मशीन चालू नसल्याने रेशन वितरण व्यवस्था बंद असल्याने अनेक लाभार्थी कुटुंबांना या महिन्याचे रेशन मिळाले नाही. रोजचा कामधंदा बुडवून दुकानांवर रेशन मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. एकीकडे रोजंदारी बुडते, तर दुसरीकडे शिधा मिळत नाही, अशा संकटाने लाभार्थी कुटुंबांचे जगणे या महिन्यात अवघड बनले.

वेळेत शिधा मिळाला नाही तर अनेक कुटुं‌बावर उपासमारीची वेळ येऊ शकते. तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर डाऊन असल्यास अथवा गती नसल्यास शासनाने तत्कालीन परिस्थितीत ऑफलाइन शिध्याचे वितरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. ही परिस्थिती राज्यात सर्वत्र असल्याचे दिसून येते.

सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानदारांची डोकेदुखी वाढली असून रोज लाभार्थी कुटुं‌बातील लोक हेलपाटे मारून बेजार झालेत. आपला कामधंदा सोडून व वेळ खर्च करून रेशन दुकानाकडे चकरा मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय उरला नाही.  ऑनलाइनच्या प्रणालीत अडचणी आहेत.

ऑफलाइन देणे शक्य नसल्याचे सांगत रेशन दुकानदार लोकांना परत पाठवीत आहे. दुसरीकडे रेशन दुकानदार सकाळपासूनच दुकानात येऊन बसतात; मात्र मशीन चालू होत नसल्याने दुकानदारही हतबल झाले आहेत. एकीकडे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, तर दुसरीकडे मशीन चालू होत नसल्याने रेशन दुकानदारांची डोकेदुखी दिवसागणिक वाढत चालली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe