अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या मोटारीच्या काचा फोडून या मोटार गाडीत ठेवलेल्या तीन सोन्या-चांदीच्या बँगा अज्ञान सहा पळविल्या.
गुरूवारी संध्याकाळी ७ ते ७.१५ या कालावधीत ही घटना घडली असून या बँगमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३०ते ३५लाख रूपयाचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे या सराफ व्यावसायिकाने सांगितले.
लोणी खुर्द या गावात तळेगाव रस्त्याला असलेल्या वेताळ बाबा चौकापासून हाकेच्या अंतरावर पिंपरी निर्मळ रस्त्यालगत संतोष कुलथे यांचे कुलथे ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे छोटेखानी दुकान आहे.
नेहमीप्रमाणे कुलथे यांनी गुरूवारी संध्याकाळी सात वाजता दुकान बंद करायचे, म्हणून दुकानातील सोन्याचांदीचे दागिने तीन वेगवेगळ्या बँगामध्ये भरले
व त्या बँगा आपल्या मोटारीत ( क्र.एम एच १७एजे ७१६०) पुढच्या सिटवर ठेऊन, मोटार गाडी लाँक करून दुकान बंद करण्यासाठी गेले.
याच वेळी या ठिकाणी तीन वेगवेगळ्या पल्सर मोटार सायकलवर सहाजण आले. यातील एकाने कुलथे याच्या मोटारीची काच तोडून या बँगा काढल्या.
दरम्यान काच तुटल्याचा आवाज आल्यावर कुलथे याच्यासह त्यांच्या दुकानातील कामगार सुनील डहाळे व आजुबाजूच्या व्यावसायिकांनी मोठ्याने आरडाओरडा केला असता,
उर्वरीत पाच दरोडेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला व या ठिकाणाहून आडमार्गाचा आधार घेत पोबारा केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved