लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईटवरून अर्ज कसा करायचा ? वाचा ए टू झेड माहिती

Updated on -

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी एक जुलै पासून अर्ज केले जात आहेत. पात्र महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत दोन कोटी महिलांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र, महिलांना या योजनेसाठी अर्ज करताना काही अडचणींचा सामना करावा लागतोय.

नारीशक्ती दुत अॅपवर अर्ज भरताना सर्वर डाऊन सारख्या तांत्रिक अडचणींमुळे महिला वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. हेच कारण आहे की आता सरकारने ladkibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे. यामुळे राज्यातील महिलांना आता दिलासा मिळणार असून त्यांना जलद गतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

तथापि अनेकांच्या माध्यमातून वेबसाईटवर अर्ज कसा करायचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. अशा परिस्थितीत आज आपण लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईटवरून अर्ज कसा करायचा याविषयी अगदी थोडक्यात पण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

वेबसाईटवरून अर्ज कसा करायचा ?

ज्या महिलांनी अजून लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरलेला नसेल त्यांना आता नारीशक्ती दूत एप्लीकेशन बरोबरच https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर सुद्धा अर्ज भरता येणार आहेत. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे.

जर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला तो तयार करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करून तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर लॉगिन करायचे आहे.

लॉगिन घेतल्यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईटचे होम पेज ओपन होणार आहे. येथे तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा पर्याय पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार आहे.

हा ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे. यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा फॉर्म ओपन होणार आहे. हा फॉर्म तुम्हाला अगदी काळजीपूर्वक भरायचा आहे. त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे. येथे तुम्हाला बँकेची देखील माहिती विचारलेली राहणार आहे. ती माहिती देखील काळजीपूर्वक भरायची आहे नाहीतर पैसे दुसऱ्यांच्या अकाउंट मध्ये जाऊ शकतात.

या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. मग एक्सेप्ट डिस्क्लेमर/हमीपत्र यावर क्लिक करायचे आहे आणि ते स्विकारायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.

हा अर्ज सबमिट झाला की तुमच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज दाखवला जाणार आहे. यावेळी तुम्हाला या अर्जाची काळजीपूर्वक पडताळणी करायची आहे. जर तुम्ही भरलेल्या अर्जात काही चूक असेल तर तुम्ही एडिट या पर्यावर क्लिक करून हा अर्ज दुरुस्त करू शकता. जर तुम्ही भरलेला अर्ज योग्य असेल तर तुम्ही दिलेला कॅप्चा कोडं भरून अर्ज सबमिट करायचा आहे.

अशा तऱ्हेने तुम्ही सरकारने सुरू केलेल्या या वेबसाईटवरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकणार आहात. तथापि ज्या महिलांनी आधीच अर्ज भरलेला आहे त्यांनी पुन्हा या वेबसाईटवरून अर्ज करायचा नाही असे आवाहन देखील सरकारने केलेले आहे. म्हणजे ज्यांनी अजून या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनीच फक्त अर्ज करायचा आहे.

योजनेचे पैसे कधी मिळणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या मंचावरून या योजनेसंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शासनाच्या महत्त्वाकांशी योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 19 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News