iPhone 14 अन iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची संधी ! ‘या’ शॉपिंग साईटवर मिळतोय मोठा डिस्काउंट, ग्राहकांना मिळणार 23 हजाराचा फायदा

Tejas B Shelar
Published:
iPhone Price Decrease

iPhone Price Decrease : पुढल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात एप्पलच्या आयफोनची नवीन सिरीज भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या या लॉन्चिंग सोहळ्याकडे नजरा लागल्या आहेत. हा हँडसेट कोणत्या तारखेला लॉन्च होणार हे अजून समोर आलेले नाही मात्र पुढल्या महिन्यात हा हँडसेट भारतीय बाजारात लॉन्च होणार हे फिक्स आहे.

खरे तर दरवर्षी एप्पल आयफोनची नवीन सिरीज लॉन्च करत असते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एप्पलची iPhone 15 सिरीज लॉन्च झाली होती आणि यंदा म्हणजेच 2024 मध्ये iPhone 16 सिरिज लॉन्च केली जाणार आहे.

तत्पूर्वी मात्र ग्राहकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. iPhone च्या जुन्या मॉडेलच्या किमती आता कमी झाल्या आहेत. लोकप्रिय शॉपिंग साईट फ्लिपकार्ट वर iPhone 14 Plus अन 15 Plus कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

दरम्यान आज आपण फ्लिपकार्टवर आयफोन 14 आणि 15 च्या खरेदीवर किती रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

iPhone 14 Plus कितीला मिळणार ?

iPhone 14 Plus हे एप्पल चे जुने मॉडेल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे. कारण की, या हँडसेटवर सध्या मोठा डिस्काउंट ऑफर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Apple च्या अधिकृत साइटवर iPhone 14 Plus 128GB व्हेरिएंटची किंमत 79,600 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा हँडसेट स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

iPhone 14 Plus चे 128GB मॉडेल फ्लिपकार्टवर केवळ 56,499 रुपयांमध्ये म्हणजेच मूळ किमतीपेक्षा 23,101 रुपयांनी कमी किंमतीत विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे.

एवढेच नाही तर हा हँडसेट खरेदी केल्यास तुम्हाला UPI व्यवहारांवर 1,000 ची अतिरिक्त सूट सुद्धा आहे. म्हणजे हा फोन फक्त 55,499 रुपयात खरेदी करता येणार आहे. या फोनवर एक्सचेंज ऑफरचा देखील ग्राहकांना लाभ मिळणार आहे.

iPhone 15 Plus कितीला मिळणार ?

आयफोनचे 15 Plus मॉडेलही फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. Apple च्या अधिकृत साइटवर iPhone 15 Plus ची किंमत 128GB मॉडेलसाठी 89,600 रुपये आहे. मात्र Flipkart वर हे मॉडेल फक्त 73,999 रुपयांना मिळतं आहे.

अर्थातच हा फोन मूळ किंमतीपेक्षा 15,601 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. तसेच UPI व्यवहारांवर 1,000 ची अतिरिक्त सूट सुद्धा उपलब्ध आहे. यामुळे हा फोन 72,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe