नोकरी नाही आणि व्यवसाय करायचा तर हातात पैसे नाहीत ही परिस्थिती आपल्याला आजकालच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही तरुणांकडे किंवा काही व्यक्तींकडे नोकरी तर असते परंतु त्यांना सोबत काहीतरी व्यवसाय देखील करायचा असतो. कारण आजकालच्या महागाईच्या काळात जितके तुमच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत असतील तितके तुमचे फायद्याचे ठरते. त्यामुळे अनेक व्यक्ती छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असतात.
परंतु असे करत असताना मात्र कोणता व्यवसाय करावा व कमीत कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय आपल्याला चांगला पैसा देऊ शकतो याबाबत बऱ्याच जणांचा मात्र बऱ्याचदा गोंधळ उडताना दिसतो. तसेच बऱ्याचदा व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु हातात पैसा नसल्यामुळे ते देखील शक्य होत नाही. हे सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या लेखात असा एक व्यवसाय बघणार आहोत जो तुम्हाला उभारण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज देखील मिळू शकते व आयुष्यभर तुम्हाला पैसा देखील देऊ शकतो.
ऑल पर्पज क्रीमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारा आणि आयुष्यभर पैसे कमवा
1) ऑल पर्पज क्रीम म्हणजे काय ?
आपल्याला माहित असेलच की ऑल पर्पज क्रीम एक पांढरी चिकट क्रीम असते. जी त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरते. हे क्रिम त्वचेला मॉइश्चराईज करून ती कोरडी पडू देत नाही व कुठल्याही ऋतूमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सध्या लोकं सौंदर्य आणि आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाल्यामुळे अशा व्यवसायांना चांगले दिवस आहेत. तसेच दिवसेंदिवस ब्युटी पार्लरच्या वाढत्या संख्येमुळे ऑल पर्पज क्रीमचे मार्केट दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. अगदी मेट्रो शहरापासून तर मोठ्या शहरांपर्यंत इतकेच नाहीतर आता ग्रामीण भागापर्यंत देखील ऑल प्रपज क्रीमची मागणी वाढताना दिसून येत आहे.
2) ऑल पर्पज क्रिमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसे उभाराल ?
ऑल पर्पज क्रीम मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या संबंधित खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये याचा संपूर्ण खर्च नमूद केला असून यानुसार जर आपण बघितले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 14 लाख 95 हजार रुपये तुम्हाला लागतील. परंतु प्रत्यक्षात हा व्यवसाय तुम्ही सुरू करण्याकरिता एक लाख 52 हजार रुपये गुंतवणूक गरजेचे राहील. बाकीचे पैसे तुम्ही कर्जरुपाने उभारू शकतात. याकरता तुम्हाला चार लाख 44 हजार रुपयांचे टर्म लोन मिळेल व त्यासोबत नऊ लाख रुपये तुम्हाला वर्किंग कॅपिटल लोन मिळू शकते.
आपण खादी व ग्रामोद्योग आयोगाचा अहवाल पाहिला तर त्यानुसार हा युनिट उभारण्यासाठी 400 चौरस मीटर जागेची आवश्यकता भासते. तसेच प्लांट व मशिनरी करिता तीन लाख 43 हजार रुपये, फर्निचर व फिक्सरसाठी एक लाख रुपये, प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस 50 हजार रुपये व वर्किंग कॅपिटल 10.25 लाख रुपये लागेल. यासाठीचे खर्च पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळते.
3) या व्यवसायातून किती होईल कमाई ?
समजा तुम्ही हा व्यवसाय उभारला व पहिल्याच वर्षी जर पूर्ण क्षमतेने काम सुरू केले तर तुमचा झालेला सर्व खर्चाची रक्कम वजा करून तुम्ही सहा लाख रुपयांचा नफा या माध्यमातून कमवू शकतात. त्यापुढे जसजसा हा व्यवसाय वाढेल तसेच तुमचा नफा देखील वाढत जाईल. जर रिपोर्टनुसार बघितले तर या व्यवसायामध्ये पाचव्या वर्षी तुमचा नफा तब्बल नऊ लाख रुपयापेक्षा जास्त होतो.