Hyundai Electric Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे आता अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्राधान्य दाखवत आहेत. तथापि सध्या स्थितीला आपल्या देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचाचं मोठा बोलबाला पाहायला मिळतोय. Tata कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वाधिक कार लॉन्च केल्या आहेत.
इलेक्ट्रिक सेगमेंटचा टाटा कंपनीचा पोर्टफोलिओ इतर कंपन्यांच्या तुलनेत मजबूत आहे. मात्र हळूहळू इतर कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत आहेत. ह्युंदाई कंपनीने देखील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये नवीन गाड्या लाँच केल्या आहेत.

ह्युंदाई ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. महत्वाचे म्हणजे ऑगस्ट महिन्यात ही कंपनी आपल्या एका लोकप्रिय इलेक्ट्रिक कारवर जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. Kona या इलेक्ट्रिक कारवर ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
खरे तर कंपनीने Kona ही इलेक्ट्रिक कार बंद केली आहे. यामुळे कंपनीने आपल्या या गाडीचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी हा डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे. दरम्यान आता आपण ह्युंदाई कंपनीच्या या बंद झालेल्या इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स आणि किमती बाबत थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत Kona Ev चे फिचर्स
Hyundai Kona EV ला भारतीय ग्राहकांमध्ये फारशी पसंती मिळाली नाही. त्यामुळे कंपनीने ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने या इलेक्ट्रिक गाडीमध्ये 39kWh चे बॅटरी पॅक दिले आहे.
हे बॅटरी पॅक 136bhp पॉवर आणि 395Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे आहे. ही इलेक्ट्रिक SUV उत्तम ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.
ही गाडी ग्राहकांना एका चार्जवर 452 किलोमीटरची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही Ev एक 5-सीटर इलेक्ट्रिक SUV आहे. ही गाडी भारतीय कार बाजारात टाटा कंपनीला आव्हान देत होती.
या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये सनरूफ, ऑटो एसी, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, 10-वे पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी असे अनेक फीचर्स पाहायला मिळतात. या गाडीत 7.0-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील प्रदान करण्यात आला आहे.
याशिवाय, सुरक्षेसाठी, या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, वाहन स्थिरता व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, सर्व डिस्क ब्रेक्स, व्हर्च्युअल साउंड सिस्टम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखें अपडेटेड फीचर्स देखील आहेत. या गाडीची एक्स शोरूम किंमत 23.84 लाख रुपयांपासून सुरू होते.