‘बाराही महिने आखाड्यात तयारी करणारा मी पहेलवान’, विखेंच्या डावावर कर्डिलेंचा प्रतिडाव ! ‘या’ मतदार संघात भिडणार

विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्ष व राजकीय नेते सध्या चाचपणी करू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यातही दिग्गज सध्या तयारीला लागेल. परंतु सध्या राज्यात असणारी राजकीय परिस्थिती आणि ज्वलंत असणारे प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती याचीच चाचपणी सध्या नेते मंडळी करत आहे.

Published on -

Ahmednagar Politics : विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्ष व राजकीय नेते सध्या चाचपणी करू लागलेत. अहमदनगर जिल्ह्यातही दिग्गज सध्या तयारीला लागेल. परंतु सध्या राज्यात असणारी राजकीय परिस्थिती आणि ज्वलंत असणारे प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती याचीच चाचपणी सध्या नेते मंडळी करत आहे.

त्यात महायुती व महाविकास आघाडी असल्याने जागावाटपात इच्छुकांना किती संधी मिळेल व किती इच्छुकांना संधी मिळेल हे सांगता येणे कठीण. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचे दोन नेते ते म्हणजे माजी खा. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याचे कारण म्हणजे दोघांची राजकीय वक्तव्ये. पहेलवानकी करायची म्हटलं तर बाराही महिने आखाड्यात तयारी करावी लागते असं वक्तव्य कर्डीले यांनी नुकतंच केलं आहे. पाहुयात सविस्तर..

सुजय विखे पाटील यांचे राहुरीवर लक्ष
विखे घराण्यातील एखादा चेहरा राहुरी मतदार संघातून विधानसभेला उभा राहील अशी चर्चा सुरू आहे. विशेषतः यात खा. सुजय विखे पाटील हे उभे राहू शकतील असे त्यांच्या अलीकडील काही वक्तव्यावरून दिसत आहे.

जर विखे पाटील उभे राहिले तर राहुरीत तनपुरे विरोधात विखे असा लढा उभा राहील. पण मग माजी आ.कर्डीले यांचे काय? ते कोठून उभे राहणार? असा प्रश्न पडतो.

माजी मंत्री कर्डिले श्रीगोंद्यात..
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले श्रीगोंद्यात उभे राहतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्या पद्धतीने ते चाचपणी करत आहेत.याच बद्दल त्यांना एका मिडीयाने विचारले की,श्रीगोंदेत तुम्ही उभे राहणार का? तशी तयारी सुरु आहे का? ते यावर म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर मी नक्कीच उभा राहील.

राहिला विषय तयारीचा तर मी नेहमीच तयारीत असतो. मी पहेलवान आहे. पहेलवानकी करायची म्हटलं तर बाराही महिने आखाड्यात तयारी करावी लागते हे मला माहित आहे. त्यामुळे मी नेहमीच तयारी करत असतो असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News