ठिबक सिंचन तर केले पण अनुदानच खात्यावर येईना ! ३६ कोटी रखडले, शेतकरी मेटाकुटीला

शेतकऱ्यासांठी शासन विविध योजना राबवत असते. यातील एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना. या योजनेअंतर्गत अनुदानावर ठिबक संच दिले जाते. मात्र दीड वर्ष लोटले तरी अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ७१७ शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही.

Ahmednagarlive24 office
Published:
thibak

Ahmednagar News : शेतकऱ्यासांठी शासन विविध योजना राबवत असते. यातील एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना. या योजनेअंतर्गत अनुदानावर ठिबक संच दिले जाते. मात्र दीड वर्ष लोटले तरी अद्यापही जिल्ह्यातील १४ हजार ७१७ शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही.

परिणामी, लाभार्थी मेटकुटीला आले असून, वारंवार चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या दोन योजनांचे तब्बल ३६ कोटी ५२ लाख रुपये अनुदान रखडले आहे. पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतीचा विकास साधण्यासाठी शासनातर्फे ठिबक, तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत शेती पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी देऊन उत्पादन घेता येते. मात्र, योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.

शेतकरी ठिबकद्वारे पिकांना पाणी देतात. ७५ ते ८० टक्के अनुदान मिळत असल्याने दरवर्षी ठिबक सिंचनचा वापर वाढल्याने पाण्याचा अपव्यय कमी झाला आहे. मात्र, अनुदान वेळेत मिळत नाही ही शेतकऱ्यांची खंत कायम आहे.

जिल्ह्यात तब्बल १४ हजार ७१७ शेतकऱ्यांनी ठिबक बसविले असून त्यांना अनुदान मात्र अद्यापही मिळालेले नाही. ३६ कोटी ५२ लाख रुपये अनुदान रखडले आहे. केंद्र व राज्य या दोघांकडून अनुदान उपलब्ध झाले नाही. पी. एम के. एस वायमधून ४५ ते ५५ टक्के अनुदान देण्यात येते.

या राष्ट्रीय कृषी विकास र्याजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात १२ हजार २२७ शेतकऱ्यांनी ठिबक बसविले असून त्यांचे ३३ कोटी अनुदान रखडले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून २ हजार ४९० शेतकऱ्यांनी ठिबक बसविले

असून त्यांचे ३ कोटी ५२ लाख अनुदान गेल्या दीड वर्षापासून मिळालेले नाही. अर्थात जिल्ह्याचे ४४ कोटी अनुदान रखडले होते. त्यापैकी ६ कोटी मार्च महिन्यात उपलब्ध झाले. उर्वरित ३८ कोटी अनुदान रखडले असून त्यात अडीच कोटी अनुदान दोन वर्षांपासून काही शेतकऱ्यांना मिळाले नाही अशी माहिती समजली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe