उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरचा अत्याचार, त्यानंतर कर्मचाऱ्याचाही कळस

अहमदनगर जिल्ह्यामधून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असून आहेत. श्रीरामपूर मध्ये अशा घटनांनी कळस गाठलाय असे चित्र आहे. आता थेट विद्यार्थिनीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
ATYACHAR

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामधून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार समोर येत असून आहेत. श्रीरामपूर मध्ये अशा घटनांनी कळस गाठलाय असे चित्र आहे.

आता थेट विद्यार्थिनीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. श्रीरामपूर येथील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉक्टरावर गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेच्या फिर्यादीवरून डॉक्टरसह एका महिला कर्मचाऱ्याला आरोपी करण्यात आले आहे. आरोपीचे नाव डॉ. रवींद्र कुटे असे आहे. त्यांचे शिरसगाव हद्दीत रुग्णालय आहे. ताप तसेच हातपाय दुखत असल्याने विद्यार्थिनी ४ ऑगस्टला डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती.

यावेळी दोन मैत्रिणी, तसेच वसतिगृहाच्या व्यवस्थापक विद्यार्थिनी सोबत होत्या. दवाखान्यात एक महिला कर्मचारी उपस्थित होती. तिने विद्यार्थिनीला बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी नेले. काही वेळाने डॉ. कुटे तेथे आले. विद्यार्थिनीला होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी विचारणा केली.

तपासणी करत असताना डॉक्टरने मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. त्याला विद्यार्थिनीने विरोध केला. दरम्यान विद्यार्थीनीने वडिलांना संपर्क केला असता वडिलांनी डॉक्टरला फक्त औषधे देण्याची सूचना केली.

यावेळी डॉक्टरने पुन्हा विद्यार्थीनीशी वाद घातला. यावेळी त्यांच्यामध्ये झटापट झाली. रुग्णालयाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.

विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने या सर्व प्रकाराची व्हिडीओ शूटिंग केली. तिला डॉक्टरने झाडू फेकून मारला, असा सर्व घटनाक्रम विद्यार्थिनीच्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक दादाभाऊ मगरे हे पुढील तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe