Ahmednagar News : ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात जिल्ह्यात आली. साडेसहा लाख जॉबकार्डधारक असून, ऍक्टिव्ह संख्या अडीच लाख इतकी जिल्हाभरात भर उन्हाळ्यात राबलेल्या मजुरांना मजुरीच्या उधारीची प्रतिक्षाच लागत आहे.
सध्या अनेक शासकीय कामे रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात येतात. रोजगार हमी योजनेच्या कामावर राबल्यास १५ दिवसांत मजुरी दिली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र या मजुरांना उधारीवरच कामावर राबविले जात आहे.
तीन महिने उलटूनही मजुरी मिळत नसल्याने मजूर वर्गात निराशा आहे. नगर जिल्ह्यात मजुरांच्या मजुरीपोटी मे पासून ११ कोटी रुपयांचा निधी आला नाही.
ग्रामीण भागात प्रमाणात घरकुल, सिंचन विहीर, लागवड, पांदणरस्ते आदी कामे करण्यात आली होती. उन्हाळ्यात कामे बंद होती. यामुळे हजारो रोजगार हमी योजनेच्या कामाचा मिळाला. २९७ रुपये मजुरीचे दर आहेत.
त्यात वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे आणि त्यात भरीस भर म्हणजे मिळत असेच निर्माण येत १२ ८७ थकीत तयारी तीन-तीन महिने प्रतीक्षा करूनही मजुरी नाही.
१५ दिवसांत मजुरीच्या दाव्यालाच हरताळ फासला जात आहे. जर असेच चित्र कायम राहिल्यास आगामी काळात रोहयोच्या कामावर मजुरांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता नाही.
नगर जिल्ह्यात जवळपास ११ ते १२ हजार रोहयो मजूरांची १० कोटी ८७ लाखांची रक्कम तीन महिन्यांपासून थकीत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद रोहयो विभागाने कामावर असलेल्या आणि कामे केलेल्या मजूरांची तालुकानिहाय माहिती करून बँकांकडे सादर केलेली आहे.
मात्र, राज्य सरकार पातवळीवरून निधी न आल्याने गेल्या ३ महिन्यांपासून रोजगार हमी विभागाचे मजूर उधारीवर काम करत आहेत.