मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर मुलाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये करता येते का गुंतवणूक? वाचा काय आहेत यासंबंधीचे नियम?

Ajay Patil
Published:
matual fund sip

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बाजारामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व त्यामध्ये प्रामुख्याने चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड एसआयपीतील गुंतवणूक ही चांगली समजली जाते. एसआयपी ही बाजाराशी निगडित असल्याकारणाने यामध्ये जोखीम देखील असते.

परंतु दीर्घकालीन गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्युच्युअल  फंड एसआयपीच्या माध्यमातून सरासरी 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो असे तज्ञ म्हणतात. याशिवाय म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून देखील सुरू करू शकतात.

म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करण्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही चांगल्या प्रकारे परतावा देत असल्याने या सगळ्या योजना फार लोकप्रिय झालेले आहेत. परंतु यासाठी जे काही गुंतवणुकीचे नियम देखील आहेत व त्या नियमांच्या अधीन राहूनच आपल्याला गुंतवणूक करता येते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा एखाद्याचे वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा मुलाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात बऱ्याचदा आला असेल.  त्यामुळे अशा अल्पवयीन म्हणजेच मायनरच्या संबंधी एसआयपीचे काय नियम आहेत ते आपण समजून घेऊ.

 काय आहेत या संबंधीचे नियम?

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराचे वय आणि गुंतवणुकीची रक्कम यावर तसे पाहायला गेले तर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.

परंतु अठरा वर्षाखालील अल्पवयीन मुलांकरिता किंवा मुलांच्या नावाने जर गुंतवणूक करायची असेल तर ती त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालकांच्या माध्यमातून करता येऊ शकते. परंतु अशा परिस्थितीमध्ये ते मुल एकमेव होल्डर असेल व जॉईंट होल्डरला यामध्ये परवानगी मिळत नाही.

 याकरता कुठल्या कागदपत्रांची गरज भासणार?

यामध्ये अल्पवयीन मुलांच्या बाबतीत गुंतवणूक करायच्या नियमांमध्ये जर पाहिले तर गुंतवणूक करताना काही कागदपत्रांची आवश्यकता भासते व यामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करताना मुलांच्या वयाचा आणि मुलांच्या असलेल्या नात्याचा पुरावा देणे खूप गरजेचे असते.

यामध्ये अल्पवयीन मुलांची जन्मतारीख आणि पालकाच्या नात्याचा पुरावा म्हणून मुलाचा जन्म दाखला, पासपोर्ट किंवा असे कोणतेही कायदेशीर किंवा वैध दस्तऐवज द्यावे लागतील. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वय आणि त्याचे पालकांशी असलेले नाते याची माहिती द्यावी लागेल.

तसेच यासंबंधीचे केवायसी साठीचे जे नियम आहे त्याचे पालन पालकांना करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही मुलांच्या खात्यातून थेटपणे व्यवहार देखील करू शकतात. परंतु पालकांच्या बँक खात्याच्या माध्यमातून जर व्यवहार केला तर थर्ड पार्टी डिक्लेरेशन फॉर्म सादर करणे गरजेचे राहते.

 मुल 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मात्र काय?

वर जे काही आपण नियम पाहिले ते जोपर्यंत मुलाचे वय अठरा वर्षाच्या आत आहे तोपर्यंत ते लागू राहतात. त्यानंतर मात्र जेव्हा मुलं 18 वर्षाचे पूर्ण होते तेव्हा पालकांना एसआयपी बंद करावी लागते. यामध्ये अल्पवयीन मुल 18 वर्षाचे जेव्हा होईल तेव्हा युनिट धारकाला त्याच्या नोंदणीकृत पत्र व्यवहार पत्त्यावर त्यासंबंधीची नोटीस पाठवली जाते

व या नोटीशीत अल्पवयीन व्यक्तीला गुंतवणुकीतील आपली स्थिती मायनर वरून मेजर करण्याकरिता विहित म्हणजेच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत माहिती दिली जाते व अशा प्रकारचा अर्ज सादर करणे गरजेचे राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe