रोहित पवारांना शह देण्यासाठी, अजितदादांनी दिली जामखेडमधील युवतीला प्रदेशाध्यक्षपदाची संधी !

Ahmednagarlive24 office
Published:
sandya rohit

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जामखेडमधील संध्या सोनवणे यांची निवड करून पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आ. रोहित पवार यांना शह दिला आहे.
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांना आव्हान देण्यासाठी आणि राज्यात युवतींचे संघटन उभे करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे समजते.

सोनवणे या जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत त्यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

या पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे आणि त्यांच्यात धाडस निर्माण करण्याचा प्रयत करणार असल्याची प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली. सोनवणे यांनी २०१८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जनरल सेक्रटरी म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अनेक वेळा यशस्वी आंदोलने केली.

खा. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून सोनवणे संघटनेत सक्रिय होत्या. राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अजित पवार यांनी २०२२ मध्ये सोनवणे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्वात प्रथम बाहेर पडलेल्या नेत्यांपैकी सोनवणे एक होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe