काम धंदा नाही..पैसे कमवायचे साधन नाही.. दारूचे व्यसन लागले.. दारू पिण्यासाठी पैसे नसायचे..त्यातूनच सुरु झाला मोटारसायकल चोरीचा फंडा.. दारू पिण्यासाठी त्याने अनेक दुचाकी चोरल्या.. दुचाकी चोरणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले.
त्याच्याकडून पाच लाख २५ हजारांच्या १५ मोटारसायकली हस्तगत केल्या.. दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरीचा मार्ग एका आरोपीने निवडला. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गंगाराम बंडू कुन्हाडे (वय ३२, रा. मु. पो. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या १५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कोतवाली पोलिस पेट्रोलिंग करत असताना इम्पिरिअल चौकाजवळ एकजण संशयितपणे फिरत असताना त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने १५ दुचाकी चोरी केल्याचे समोर आले.
पैशाची आवश्यकता असल्याने माळीवाडा परिसरातून काही मोटारसायकली चोरी केल्या. त्या काही दिवस वापरून त्यातले पेट्रोल संपल्यावर त्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या असून विक्री करीता ग्राहक शोधत आहे असे सांगितले.
त्याच्याकडून पाच लाख २५ हजारांच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलिस निरीक्षक विकास काळे, पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे, कृष्णकुमार शेंदवाड, पोलिस हेडकॉन्स्टेबल सूर्यकांत डाके,
विक्रम वाघमारे, विशाल दळवी, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, रियाज इनामदार, संगिता बडे, अविनाश वाकचौरे, सलिम शेख, सत्यम शिंदे, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अनुप झाडबुके, सचिन लोळगे, अतुल काजळे, सतिष शिंदे, सुरज कदम, तानाजी पवार, दीपक रोहोकले, राम हंडाळ, शिवाजी मोरे यांच्या पथकाने केली.