अहमदनगरमधील मोक्कातील आरोपीने घरात घुसून गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाला मारहाण केली, त्यानंतर..

अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता मोक्कातील संशयित आरोपीने थेट गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून धुडगूस घातलाय.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता मोक्कातील संशयित आरोपीने थेट गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून धुडगूस घातलाय.

ही घटना नगर शहरातील काटवन खंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयामागे ही घटना घडली. महिला वकिलाच्या घरात घुसून या आरोपीने त्यांना मारहाण केली.

घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कोर्ट कामकाजाची मूळ कागदपत्रे नेली. किरण बबन कोळपे (रा. विळद ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अॅड. नाजमीन वजीर बागवान (वय ३२) यांनी फिर्यादी दिली असून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण कोळपे विरोधात २०२२ मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे वकिलपत्र फिर्यादीकडे होते. तसेच, किरण विरोधात २०२३ मध्ये राहुरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला. या गुन्ह्याचे कामकाजही फिर्यादीकडेच होते. त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला. गुरुवारी तो काटवन खंडोबा येथील फिर्यादीच्या घरी आला.

फिर्यादीचा हात पिरगाळून दुखापत केली. घरातील कपाटाची उचकापाचक करून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याच्या साखळ्या, ३२ हजार ७०० रूपयांची रोकड व किरण याच्याविरूध्द दाखल कोर्ट कामकाजाची कागदपत्रे नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी निषेध नोंदवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe