ब्रेकिंग ! आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, पण ‘हे’ 30 जिल्हे कोरडे राहणार, IMD चा अंदाज

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस आणि हजेरी लावल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे हे खरे आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र राज्यातील बहुतांशी भागांमध्ये आज आणि उद्या पावसाची उघडीप राहणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे, आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणातील पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड येथे आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेचं खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचे रिलावणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. उद्या मात्र पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे.

आज राज्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज होता. उद्या मात्र राज्यातील पाच-सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

उद्या अर्थातच रविवारी दक्षिण कोकणातील रायगड अन मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरच पावसाचा जोर राहणार आहे.

जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर फारच कमी राहील असे म्हटले जात आहे. दुसरीकडे विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे. पण राज्याच्या 30 जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार अशी शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe