Ahmednagar News : मोक्क्याच्या गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने महिला वकिलांच्या घरात झुसून मारहाण करीत दागिने व खटल्याची कागदपत्रे चोरून नेली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तो रुग्णालयातून पसार झाला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.
दरम्यान, पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून, रात्री उशिरापर्यंत आरोपी सापडला नव्हता. किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
त्याने गुरुवारी रात्री काटवन खंडोबा परिसरातील एका महिला वकिलाच्या घरात घुसून सोन्याचे दागिने व मोक्काच्या गुन्ह्यातील कागदपत्रे चोरून नेली. घरातील कपाटाच उचकापाचक करून त्याने साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याच्या साखळ्या,
३२ हजार ७०० रूपयांची रोकड व किरण याच्याविरूध्द दाखल मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मूळ कागदपत्रे नेले. या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी त्याल अटक केली. आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले.
तिथे पोलिसांना चकवा देऊन रात्रीच फरार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अमोल भारती यांच्यासह पथक शोधासाठी रात्रीच रवाना झाले.
मात्र, तो दुसऱ्या दिवशी रात्रीही मिळून आला नाही. शनिवारी जास्तीची पथके रवाना करण्यात आली आहेत.