Maharashtra Best Picnic Spot : ऑगस्ट महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. म्हणजेच आता मान्सून फक्त दीड महिना बाकी राहिला आहे. दीड महिन्यांनी मान्सून आपला निरोप घेणार आहे. अशा परिस्थिती जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पावसाळी पिकनिक चा प्लॅन बनवत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप 3 पर्यटन स्थळांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
महाराष्ट्रातील टॉप 3 पर्यटन स्थळे

पाचगणी : पावसाळ्यात फिरायचा विषय निघाला की सर्वप्रथम डोळ्यापुढे फिरते ते हिल स्टेशनचे दृश्य. महाराष्ट्रात तुम्हाला शेकडो हिल स्टेशन पाहायला मिळतील मात्र पाचगणी या हिल स्टेशनची बातच काही न्यारी आहे.
हे महाराष्ट्रातील असे हॉट फेवरेट हिल स्टेशन आहे जिथे तुम्हाला कायम गर्दी पाहायला मिळेल. हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा तुम्हाला या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळणार आहे.
परंतु येथे जाण्याची खरी मजा पावसाळ्यात आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात कुठेच फिरायला गेला नसाल तर या ठिकाणी नक्कीच जा. खरंतर हे ठिकाण पाच टेकड्यांनी वेढलेले आहे यामुळे याला पाचगणी असे नाव पडले आहे.
येथील सुंदर निसर्ग, चित्त थरारक दृश्य तुमची पिकनिक नक्कीच यादगार बनवणार आहेत. धोम धरण, बामणोली तलावासारखे निर्मळ तलाव, पारसी पॉइंट, राजपुरी लेणी हे येथील काही फेवरेट स्पॉट आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता.
माथेरान : शिमला मनाली कुल्लू येथे जाऊ नये तो फील येणार नाही असा फील तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या मातीत मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त तुमची बॅग पॅक करून भारतातील “सर्वात सुंदर हिल स्टेशन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन आपल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरानला जायचे आहे. माथेरान येथे गेल्यास तेथील विहंगम दृश्य तुमचे मन मोहून घेतील.
तुम्हाला तेथून निघावे तेच वाटणार नाही. तेथील आश्चर्यकारक सूर्यास्त, सूर्योदय आणि शांततापूर्ण दृश्य मनाला खूपच अपरिमित आनंद देऊन जातात. शहरातील गोंगाट आणि प्रदूषणापासून सुटका हवी असेल तर तुम्ही माथेरानला भेट देऊ शकता. हे देखील पावसाळ्यात एक्सप्लोर करण्यासाठी एक बेस्ट ठिकाण आहे. हे देशातील सर्वात छोटे पण सुंदर हिल स्टेशन आहे.
जव्हार : अनेकांना महाराष्ट्रातील या सुंदर हिल स्टेशनची माहिती नाहीये. पण जव्हार माथेरान आणि पाचगणी सारखेच सुंदर आहे. येथे देखील तुम्हाला निसर्गाचे अद्भुत दृश्य पहायला मिळणार आहेत. या ठिकाणी असणारा सुंदर निसर्ग, वातावरणातील गारवा, शांतता, घनदाट जंगल, डोंगर, दर्या, दाट धुके, धबधबे खरंचं पाहण्यासारखे आहेत.
हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी पावसाळी काळात पर्यटकांची मोठी गर्दी असते. राज्यातील पर्यटक तर येथे येतातच राज्याबाहेरील पर्यटक देखील या ठिकाणी गर्दी करतात हे विशेष. तुम्हालाही महाराष्ट्राची सुंदरता अनुभवायची असेल तर जव्हारला एकदा नक्कीच पिकनिकला जा.