Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून मुसळधार पावसाने एक्झिट घेतली आहे. पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण उल्लेखनीय कमी झाले असून आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी नुकताच सार्वजनिक केला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 ऑगस्टपर्यंत अर्थातच रक्षाबंधनापर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या कालावधीत राज्यातील कोणत्याचं जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज समोर आला आहे.

महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल
या काळात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. पण, त्यानंतर हवामानात मेजर चेंजेस होण्याची शक्यता आहे. 19 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार असून 20 ऑगस्ट पासून पुढील बारा ते तेरा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खरंतर जुलै महिन्याची सुरुवातीला पावसाचा जोर फारच कमी होता. परंतु ऑगस्ट च्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला.
सप्टेंबरच्या सुरुवातीलाही मुसळधार
आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुसळधार पावसाला 20 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार आहे.या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण, राज्यात 19 ऑगस्टपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे असेल, पावसाची उघडीप राहील असा अंदाज आहे.
20 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर
तथापि, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्ट पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू राहणार असे पंजाब रावांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
एकंदरीत राज्यातील बहुतांशी भागात 19 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत कारण की 20 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.