Traffic Challan : आजची ही बातमी कार, बाईक चालवणाऱ्या वाहनधारकांसाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर जगातील प्रत्येक देशात वाहन चालवण्याचे काही नियम असतात. वाहन चालवण्यासाठी फक्त ड्रायव्हिंग लायसन्स असणेच पुरेसे नसते तर वाहनधारकांना सरकारने ठरवून दिलेल्या ट्रॅफिकच्या नियमांचे देखील पालन करावे लागते. भारतातही मोटर वाहन कायदा अस्तित्वात आहे.
या कायद्यात वेळोवेळी सरकारकडून बदलही केले जात आहेत. या कायद्यात वाहन चालवण्याबाबतचेही नियम आहेत. मात्र भारतात या वाहन कायद्याच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जाते. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास ट्राफिक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
जसे की ड्रायव्हिंग लायसन्स नसणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो. जर तुम्ही बाईक चालवत असाल तर तुम्ही हेल्मेट घातलेले असणे आवश्यक आहे. विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार व्यक्तीकडून सुद्धा दंड वसूल केला जातो.
लुंगी बनियान, चप्पल घालून बाईक चालवणाऱ्यांकडून दंड ?
खरंतर हा कायदा भारतात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र यातील नियमांची अनेकांना माहिती नसते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये लुंगी बनियान, चप्पल घालून बाईक चालवणाऱ्यांकडून ट्रॅफिक पोलिसांकडून दंड वसूल केला जातो असा दावा केला जात आहे.
यामुळे खरंच भारतीय वाहन कायद्यात असे प्रावधान आहे का? यासंदर्भात अनेकांनी विचारणा केली होती. दरम्यान आता याच प्रश्नाचे उत्तर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
बूट किंवा सॅंडल घालून बाईक चालवा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की बाईक चालवताना नेहमी चांगले बूट किंवा सॅंडल घातले पाहिजेत. जर तुम्ही चप्पल घालून बाईक चालवली आणि दुर्दैवाने अपघात झाला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. शिवाय गेअर चेंज करायलाही त्रास होतो. यामुळे नेहमीच बूट किंवा सॅंडल घालून बाईक चालवायला हवी.
मात्र असे असेल तरी भारतात चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास कोणताच दंड आकारला जात नाही. वाहन कायद्यात अशी कुठलीच तरतूद नाहीये. म्हणजे चप्पल घालून बाईक चालवली तर वाहन चालकाकडून दंड वसूल केला जात नाही अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल अफवांपासून सावध रहा
चप्पल घालणं, अर्ध्या बाह्यांच शर्ट, लुंगी -बनियान घालून बाईक चालवणं,गाडीचा आरसा खराब असणं अथवा गाडीत एक्स्ट्रॉ बल्ब नसणं अशा गोष्टींमुळे चालान कापले जात नाही म्हणजे दंड आकारला जात नाही. यामुळे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असणाऱ्या अशा अफवांपासून सावध रहावे, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.