Personal Loan : 3 वर्षासाठी 2 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर किती भरावा लागेल EMI ? ‘या’ बँका देतात स्वस्त दरात पर्सनल लोन

Ahmednagarlive24 office
Updated:

Personal Loan :- आयुष्यामध्ये कोणत्या वेळी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासेल याचा कोणत्याही प्रकारचा नेम नसतो. अनेकदा घरामध्ये किंवा स्वतःचे आपले काहीतरी आरोग्य विषयक समस्या उद्भवते व मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो.

त्याशिवाय घरामध्ये लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमानिमित्त देखील मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व ही पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी साहजिकच कर्जाचा पर्याय स्वीकारला जातो. यामध्ये कधी कधी मित्र किंवा नातेवाईकांकडून पैशांची व्यवस्था केली जाते व दुसरा पर्याय म्हणजे बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन घेऊन पैशांची गरज भागवली जाते.

कुठलेही लोन गेल्या अगोदर बँकांकडून अर्जदाराचा सिबिल स्कोर चेक केला जातो व सिबिल स्कोर उत्तम असेल तर पटकन बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन मिळते. परंतु यामध्ये पर्सनल लोनवरील व्याजदर हा देखील पाहणे खूप गरजेचे असते. इतर कर्जापेक्षा पर्सनल लोनवरील व्याजदर जास्त असतो.

कारण हे असुरक्षित स्वरूपातील कर्ज आहे. त्यामुळे ज्या बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज मिळेल अशा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन घेणे फायद्याचे ठरते. त्यामुळे या लेखात आपण कमी व्याजदरात पर्सनल लोन कोणत्या बँकांच्या माध्यमातून दिले जाते याबद्दलची माहिती बघू.

या बँका देतात कमी व्याज दारात पर्सनल लोन

1- पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँक- पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या माध्यमातून जर पर्सनल लोन घेतले तर ही बँक 10.4 टक्के दराने पर्सनल लोन देते.त्यानुसार जर तुम्ही तीन वर्षांच्या कालावधीकरिता दोन लाख रुपये पर्सनल लोन घेतले तर त्याचा ईएमआय तुम्हाला 6491 रुपये भरावा लागेल.

2- एचडीएफसी बँक- एचडीएफसी बँक ही देखील देशातील एक सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असून बँकेतून जर पर्सनल लोन घेतले तर ही बँक 10.5% व्याजदर आकारते. या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही तीन वर्षाच्या कालावधीकरिता दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला सहा हजार पाचशे रुपये ईएमआय भरावा लागतो.

3- पंजाब आणि सिंध बँक- पंजाब आणि सिंध बँक ही देखील देशातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून जर पर्सनल लोन घेतले तर या बँकेचा प्रारंभिक व्याजदर 10.75 टक्के आहे. जर या बँकेच्या माध्यमातून तीन वर्षांच्या कालावधीकरिता दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले तर दर महिन्याला सहा हजार पाचशे चोवीस रुपये ईएमआय भरावा लागतो.

4- इंडसइंड बँक- जर इंडसइंड बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याचा तुमचा विचार असेल तर ही बँक पर्सनल लोनवर 10.50 टक्क्यांपासून पुढे व्याजदर आकारते. इंडसइंड बँकेच्या माध्यमातून तुम्ही तीन वर्षांच्या कालावधीत दोन लाख रुपयांची कर्ज घेतले तर तुम्हाला दर महिना 6500 रुपये ईएमआय भरावा लागतो.

5- बँक ऑफ इंडिया- बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर ही बँक कमीत कमी 10.85 टक्के व्याजदर आकारते.जर बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुम्ही तीन वर्षाच्या कालावधीकरिता दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला किमान 6533 रुपये ईएमआय भरावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe