SBI 5 Years FD Scheme : आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अनेक जण गुंतवणुकीच्या तयारीत आहेत. जर तुमचेही तसेच काहीसे प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. विशेषता ज्यांना एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी आजचा हा लेख अधिक फायद्याचा ठरणार आहे.
कारण की, आज आपण एसबीआयच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे बँकांकडून आता एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे.

यामुळे महिला वर्ग देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. एसबीआय देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज ऑफर करते.
कशी आहे एसबीआयची पाच वर्षांची एफडी योजना
एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी सात वर्षांपासून ते दहा वर्ष कालावधीसाठी एफडी ऑफर करते. एसबीआयचे एफडीचे व्याजदर टाईम पिरियडनुसार बदलते.
जसे की एसबीआय दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी सामान्य ग्राहकांना सात टक्के एवढे व्याजदर ऑफर करते. मात्र याच कालावधीच्या एफडी मध्ये सीनियर सिटीजन ग्राहकांनी गुंतवणूक केली तर त्यांना 7.50% दराने व्याज मिळते.
दुसरीकडे पाच वर्षांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर एसबीआय कडून सामान्य ग्राहकांना 6.50% या रेटने व्याज दिले जात आहे तसेच याच एफडी साठी सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.50% या रेटने व्याज दिले जात आहे.
5 वर्षांच्या एफडी मध्ये तीन लाखांची गुंतवणूक केल्यास
जर समजा एखाद्या सामान्य ग्राहकाने एसबीआयच्या पाच वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर चार लाख 14 हजार 126 रुपये मिळणार आहेत.
तसेच, जर सिनिअर सिटीजन ग्राहकाने याच कालावधीच्या एफ डी मध्ये तीन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना चार लाख 34 हजार 984 रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच या एफ डी मधून सामान्य ग्राहकांना एक लाख 14 हजार 126 रुपये एवढे व्याज मिळणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना एक लाख 34 हजार 984 रुपये व्याज मिळणार आहे.