अहमदनगर, पुण्यात कसे राहणार हवामान ? कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

राज्यातील काही भागांमध्ये 15 ऑगस्ट पासून पावसाची सक्रियता जाणवत असून काही ठिकाणी कालपासून म्हणजेच 16 ऑगस्ट पासून पाऊस सक्रिय झाला आहे. तसेच काही ठिकाणी आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट पासून पावसाची सक्रियता जाणवणार असल्याचा अंदाज समोर आला आहे.

Tejas B Shelar
Updated:

Maharashtra Rain : राज्यात गेल्या 8-9 दिवसांपासून रजेवर असणारा मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. खरे तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ अन पश्चिम महाराष्ट्रातूनही पाऊस गायब झाला.

यामुळे ज्या ठिकाणी जुलै महिन्यात आणि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता, पूरस्थिती तयार झाली होती, शेतात पाणी साचले होते अशा भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मात्र आता पावसाचा खंड तब्बल दहा दिवसांवर येऊन पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधडही वाढू लागली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याची घोषणा केली आहे.

हवामान खाते 18 तारखेपासून राज्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असे बोलत होते. पण, जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने अठरा तारखेच्या आधीच राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये 15 ऑगस्ट पासून पावसाची सक्रियता जाणवत असून काही ठिकाणी कालपासून म्हणजेच 16 ऑगस्ट पासून पाऊस सक्रिय झाला आहे. तसेच काही ठिकाणी आजपासून म्हणजे 17 ऑगस्ट पासून पावसाची सक्रियता जाणवणार असल्याचा अंदाज समोर आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्‍यता आहे. आज राज्यातील तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी झाला आहे. दरम्यान, आता आपण राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कुठं बरसणार जोरदार पाऊस ?

आज शनिवारपासून राज्यातील विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर आज पासून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली म्हणजेच संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

म्हणून या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे देखील आजपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe