तरुणांसाठी महत्त्वाची आहे एलआयसीची ‘ही’ योजना !

सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला व संबंधित पॉलिसीधारकाने जर कर्ज घेतले असेल तर कर्ज परतफेडची चिंता मागच्या कुटुंबाला राहणार नाही.

Ajay Patil
Updated:
LIC policy

LIC Policy :- जीवनाचा कुठल्याही प्रकारचा भरोसा नाही हे वाक्य आपण सहज बोलून जातो किंवा ऐकत असतो आणि ते त्रिकालबाधित सत्य देखील आहे. बऱ्याचदा आपण अशा घटना समाजामध्ये बघतो की घरातील कर्ता पुरुष अचानक जातो आणि त्यानंतर मात्र मागे उरलेल्या कुटुंबाची खूप मोठ्या प्रमाणावर वाताहत होते व ही होणारी वाताहात जास्त करून आर्थिक दृष्टिकोनातून होत असते.

त्यामुळे असे काही दुर्दैवी घटना घडली तर मागच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य लाभावे किंवा आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून विमा ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. विम्याच्या बाबतीत बघितले तर भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी अनेक आकर्षक योजनांच्या  माध्यमातून ग्राहकांना विम्याचा लाभ देत असते.

विम्याचे संरक्षण हे आयुष्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे असते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण एलआयसीचे प्लॅन पाहिले तर एलआयसीच्या माध्यमातून तरुणांचे हित लक्षात घेऊन काही नवीन योजना ऑफर केलेल्या आहेत.

यामध्ये एलआयसीने कर्ज परतफेडीसाठी मुदत विमा आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या असून त्या ग्राहकांना ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध आहेत.

 कशी आहे एलआयसीची तरुणांसाठी असलेली योजना ?

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या माध्यमातून कर्ज परतफेड करता यावी याकरिता मुदत विमा आणि सुरक्षा देता यावी याकरिता चार नवीन योजना सुरू केल्या असून यातील युवा क्रेडिट लाईफ/ डीजी क्रेडिट लाईफ योजना ही खूप महत्त्वाची आहे.

ज्या व्यक्तींनी अगोदर कर्ज घेतले आहे किंवा कर्ज घ्यायचे आहे अशा लोकांकरिता एलआयसीच्या या  योजनेच्या माध्यमातून खास योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला व संबंधित पॉलिसीधारकाने जर कर्ज घेतले असेल तर कर्ज परतफेडची चिंता मागच्या कुटुंबाला राहणार नाही. या योजनेच्या माध्यमातून जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येते.

 कसे आहे एलआयसीच्या युवा टर्म/ डीजी टर्म प्लॅनचे स्वरूप ?

एलआयसीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली युवा टर्म प्लॅन खूप महत्वपूर्ण असून विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक सुरक्षा या माध्यमातून मिळते. 18 ते 45 वयोगटातील लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. परंतु या योजनेच्या परिपक्वते करिता वयोमर्यादा 33 ते 75 वर्षे आहे.

या योजनेमध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ही टर्म इन्शुरन्स योजना नसून फक्त कर्जाची जबाबदारी कमी करते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे जर पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाला

तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची या प्लॅन अंतर्गत संरक्षण करता येते व कुटुंबातील सदस्याला कर्जाची रक्कम परत करावी लागत नाही. त्यामध्ये गृहकर्ज तसेच शैक्षणिक कर्ज व कार कर्जाचा देखील समावेश आहे.

 कसे आहेत या योजनेच्या विम्या हप्त्याचे प्रकार ?

एलआयसीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या योजनेमध्ये चार प्रकारच्या प्रीमियम सुविधा देण्यात आले असून यामध्ये सिंगल पाच वर्षापर्यंत प्रीमियम, दहा आणि पंधरा वर्षापर्यंत प्रीमियम समाविष्ट असणार आहे. या प्लानमध्ये तुम्ही किती वर्षांकरिता प्लॅन घेत आहात यावर तुमचा प्रीमियम अवलंबून असणार आहे. हा प्रीमियम वार्षिक किंवा सहामाही आधारावर भरणे गरजेचे राहील. यामध्ये….

1- पाच वर्षापर्यंत प्रीमियम जर दहा ते तीस वर्षाच्या पॉलिसी मुदतीकरिता पाच वर्षापर्यंत प्रीमियम आहे.

2- दहा वर्षापर्यंत प्रीमियम 15 ते 30 वर्षांच्या पॉलिसी मुदतीकरिता

3- पंधरा वर्षापर्यंत प्रीमियम पंचवीस ते तीस वर्षांच्या पॉलिसी मुदतीकरिता

 काय आहेत एलआयसीच्या या प्लॅनची वैशिष्ट्ये ?

1- या प्लॅनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पॉलिसीधारकाचा जर मृत्यू झाला तर पॉलिसीधारकाने घेतलेल्या कर्जाची परतफेड ही पॉलिसीमधून मिळालेल्या रकमेतून केली जाते. कुटुंबातील सदस्य हे पॉलिसीधारकाने घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी जबाबदार राहत नाही.

2- समजा यामध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला नाही आणि पॉलिसीची मुदत जर पूर्ण झाली तर मात्र पॉलिसीधारकाला कोणत्याही प्रकारची रक्कम या माध्यमातून मिळत नाही. म्हणजेच इतर प्लॅन प्रमाणे या योजनेचे मॅच्युरिटी फायदे मिळत नाहीत.

3- समजा एखाद्या व्यक्तीने पॉलिसी सरेंडर केली तर एलआयसीच्या नियमानुसार रक्कम पॉलिसीधारकाला परत केली जाते.

4- तसेच ज्याप्रमाणे एलआयसीच्या इतर प्लॅन अंतर्गत कर्ज सुविधा मिळते. त्या प्रकारची कर्ज सुविधा यामध्ये मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe