रक्षाबंधनाला देशातील ‘या’ राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या राहणार ! महाराष्ट्रात बँक चालू राहणार की बंद? RBI ने स्पष्टचं सांगितलं

आज आपण उद्या देशातील कोणत्या राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार अन कुठे बँका सुरळीत चालू राहणार याबाबत जाणून घेणार आहोत. आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भात माहिती दिलेली आहे.

Published on -

Banking News : बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर उद्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा आनंददायी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्षाबंधनाच्या सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही अशाच उत्साहात हा सण साजरा होणार आहे.

या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून राखी बांधत असते. जर समजा भाऊ दुसऱ्या गावात असेल अन तो बहिणीकडे येऊ शकत नसेल किंवा बहिणीला भावाकडे जाता येत नसेल तर बहीण आपल्या भावासाठी पोस्टाद्वारे राखी पाठवत असते.

बहिण-भावाच्या प्रेमाला अधोरेखित करणारा हा सण संपूर्ण देशात उद्या अर्थातच 19 ऑगस्टला आनंदाने साजरा केला जाणार आहे. मात्र अनेकांच्या माध्यमातून उद्या रक्षाबंधन असल्याने बँकांना सुट्टी राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

यामुळे आज आपण उद्या देशातील कोणत्या राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार अन कुठे बँका सुरळीत चालू राहणार याबाबत जाणून घेणार आहोत. आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भात माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्रात रक्षाबंधनाच्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार का

आपल्या राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी बँकेला सुट्टी नसते. यंदा देखील महाराष्ट्रात रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी राहणार नाही. म्हणजेच उद्या 19 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्रातील बँका सुरळीत चालू राहणार आहे.

नेहमीप्रमाणेच उद्या बँकांचे कामकाज होणार आहे. यामुळे जर तुमचे उद्या बँकेत काही काम असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकणार आहात. परंतु देशातील काही राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी राहणार आहे.

कोणत्या राज्यातील बँका बंद राहणार?

उद्या रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा अन याच दिवशी बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचा जन्मदिवस आहे. यामुळे देशातील काही राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत.

उद्या अगरतळा, अहमदाबाद, भूवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ आणि शिमला या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe